Maharashtra Politics saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: फडणवीसांच्या भेटीनंतर ठाकरे बंधूंच्या युतीला ब्रेक? पाहा स्पेशल रिपोर्ट

Thackeray Brothers: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना गुपचूप भेट दिली आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देत महत्त्वपूर्ण संवाद साधल्याची माहिती समोर आली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना ब्रेक लागल्याचं चित्र आहे. कारण मनसेनं आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची गुप्त भेट घेतली. नेमकं काय घडलंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची गुप्त भेट घेतली. एवढंच नाही तर राज ठाकरेंच्या वाढदिवसाचं निमित्त साधून शुभेच्छाही दिल्या. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीला ब्रेक लागल्याची चर्चा आहे. तर फडणवीसांच्या भेटीनंतर मनसेचे युतीसंदर्भातील सूरही बदललेत.

विधानसभा निवडणूकीत मनसे आणि ठाकरे गटाची जोरदार पिछेहाट झाली. त्यानंतर ठाकरे ब्रँडच संकटात सापडल्याने राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना साद घातली. तर उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिला. त्यानंतर मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाल्याचं पहायला मिळालं. मात्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतरही ठाकरे गट युतीसाठी आशादायी आहे.

खरंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकमेकांना साद घातल्यानंतर कार्यकर्ते आग्रही असताना युतीची चर्चेचं घोडं नेमकं कुठं अडलं असण्याची शक्यता आहे? पाहूयात.

युतीचं घोडं कुठं अडलं?

2014 आणि 2017 मध्ये मनसेला सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने सावध पवित्रा

उद्धव ठाकरेंकडून ठोस प्रस्ताव येण्याची राज ठाकरेंना आशा

फडणवीस-ठाकरे भेटीतून बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न

मनसेकडून पक्षाच्या ताकदीचा आढावा घेण्याची रणनीती

फडणवीसांच्या भेटीनंतर मनसेनं घुमजाव केलं असलं तरी ठाकरे गट मात्र आशादायी आहे... त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नातेवाईकांच्या दबावामुळे पुन्हा युतीची बोलणी सुरु होणार की 2014 आणि 2017 प्रमाणे युतीच्या चर्चा हवेतच विरणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : जयंत पाटील तुमच्या पक्षात येणार का? अजित पवार स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update : -प्रविण गायकवाड यांच्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा व शाईफेकीचा संभाजी ब्रिगेडने केला निषेध

छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाडांना काळं फासलं|VIDEO

Saree Trending Look: विद्या बालन सारखं ग्लॅमरस दिसायचं आहे? मग फॉलो करा हा साडी लूक

Juicy Cheese Burger : घरच्या घरी ज्युसी चीज बर्गर बनवण्याची झटपट रेसिपी लगेचच करा नोट

SCROLL FOR NEXT