jalna crime news Saam Tv
महाराष्ट्र

भयंकर! विधवा महिलेची प्रियकराने केली दगडाने ठेचून हत्या, समोर आलं धक्कादायक कारण

जालना येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

जालना : येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घनसावंगी तालुक्यात बोधलापुरी येथे एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पीडित विधवा महिलेची हत्या तिच्या प्रियकारने (widow death) केली असल्याची माहिती उघड झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. याप्रकरणी (police case filed) पोलिसांनी गु्न्हा दाखल करत (culprit arrested) आरोपीला अटक केली आहे. महादेव कडुकर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पीडित महिलेनं एक लाख रुपयांची मागणी करत पैसे देण्यासाठी प्रियकराकडे तगादा लावला होता. याचाच राग मनात ठेवून आरोपी कडुकरने पीडित महिलेची हत्या केली, अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोधळापुरी शिवारात एका महिलेचा मृतदेह आढळल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर पोलीस सूत्रांच्या मदतीने आरोपी महादेव कडुकर याचा शोध घेवून त्याला अटक केली. आरोपीला पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने महिलेची हत्या केली असल्याचं कबुल केलं.

महिलेचा दगडाने ठेचून खून करून तिचा मृतदेह पुलाखाली फेकला, अशीही माहिती आरोपी कडुकरने पोलिसांना दिली. पीडित महिलेशी गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमसबंध होते. सदर महिलेने एक लाख रुपयांची मागणी करत तगादा लावला होता. त्यामुळे रागाच्या भरात महिलेची हत्या केली, असंही जबाब आरोपी कडुकरने पोलिसांना दिला.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar Crime : किरकोळ वादातून भररस्त्यात चाकू हल्ला; तरुणाचा मृत्यू, नंदुरबारमध्ये तणावाचे वातावरण

Shahrukh Khan: शाहरुख खानसाठी मुलगा आर्यन झाला फोटोग्राफर; 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'च्या स्क्रीनिंगचा VIDEO व्हायरल

High Court: मराठा आरक्षणाच्या GR विरोधात याचिका, न्यायाधीशांनी दिला मोठा निर्णय, कोर्टात नेमकं काय काय झालं?

Maharashtra Live News Update: एमएससीबीच्या वायरमेनच काम करणे शेतकऱ्याच्या जीवावर बेतले

म्हाडाकडून बंपर लॉटरी; पिंपरी चिंचवडमध्ये प्राईम लोकेशनवर फक्त ₹२० लाखांत घर, आजच अर्ज करा

SCROLL FOR NEXT