boyfriend kills married woman saam tv
महाराष्ट्र

संतापजनक! प्रियकराने विवाहित महिलेची हत्या करून मृतदेह जाळला, पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...

एका विवाहित महिलेचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

रायगड : येथील मुरूड तालुक्यात एका विवाहित महिलेचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धनगरवाडी-महलोर रस्त्यावर प्रियकराने एका विवाहित महिलेची हत्या करून तिचा मृददेह जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पूनम असं मृत तरुणीचं नाव असून ती २१ ऑगस्टपासून अलिबाग (Alibag) येथून बेपत्ता होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची सूत्र वेगानं फिरवत प्रकरणाचा छडा लावला. त्यानंतर पोलिसांनी (police) आरोपी सचिनला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुरूड तालुक्यातील धनगर वाडी-महलोर रस्त्यावर प्रियकराने विवाहीत महिलेची हत्या करून मृतदेह जाळल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर या घटनेचा कसून तपास केला. प्रेमसंबंधातून हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. प्रेमीयुगुलांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वादविवाद होऊन हत्याकांड झाल्याचं तपासात उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरु आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

SCROLL FOR NEXT