Vasai News
Vasai News  Saam TV
महाराष्ट्र

Boy end life due to mother Scolded : आई ओरडली म्हणून १६ वर्षीय मुलानं जीवन संपवलं, विरारमधील दु:खद घटना

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

Vasai-Virar News :

आई ओरडली म्हणून १६ वर्षाय अल्पवयीन मुलाना जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाने तलावत उडी घेत आत्महत्या केली आहे. सोहम चक्रवर्ती असे या मुलाचे नाव आहे.

सोहम चक्रवर्ती हा अल्पवयीन विरार पूर्वेच्या मनवेलापाडा येथील रामविला अपार्टमेंटमध्ये राहत होता. सोहम वसईतील एका महाविद्यालयात अकरावी कॉमर्सचं शिक्षण घेत होता. या घटनेने सोहमच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगल कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोहमने सोमवारी क्लासला दांडी मारली होती. त्याने क्लास बुडवल्याचे समजल्यावर त्याची आई त्याला ओरडली होती. त्यामुळे रागात तो घराबाहेर निघून गेला होता. मात्र बराच वेळ झाला तरी तो घरी परतलाच नाही. (Latest Marathi News)

अखेर सोहन वेळेत घरी न आल्याने त्याच्या पालकांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मुलगा अल्पवयीन असल्याने विरार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता. (Maharashtra News)

दरम्यान, त्याचा शोध सुरू असताना विरार पूर्वेच्या साईदत्तनगर येथील खदाणीच्या तलावात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याने रागाच्या भरात तलावात उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना; भावेश भिंडेला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी

MEA Advisory: नोकरीसाठी जाल अन् गुलामगिरीच्या जाळ्यात अडकाल! कंबोडियाला जाणाऱ्यांसाठी परराष्ट्र मंत्रायलाने जारी केली अ‍ॅडव्हायझरी

Effects of Aelovera: 'या' लोकांनी चेहऱ्यावर कोरफड जेल लावल्यास होतील गंभीर परिणाम

Yad Lagla Premacha: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत मराठी बिग बॉस फेम अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार अनोखी भूमिका

Sonia Gandhi: मी माझा मुलगा तुम्हाला सोपवते, राहुल यांच्या निवडणूक प्रचारात सोनिया गांधी यांचं भावनिक भाषण

SCROLL FOR NEXT