Police tighten security at Union Minister Nitin Gadkari’s Nagpur residence after bomb threat call. Saam tv
महाराष्ट्र

Breaking : घराला बॉम्बने उडवून टाकू! मित्राचा फोन घेतला अन् केंद्रीय मंत्र्याला धमकी दिली, नागपुरात खळबळ

Bomb threat to Nitin Gadkari’s residence in Nagpur : नागपूरमधील गडकरी यांच्या निवासस्थानाला बॉम्बने उडवून टाकण्याची फोनवरून धमकी आली आहे. पोलिसांनी गडकरींच्या महाल आणि वर्धा रोडवरील निवासस्थानाची तपासणी करून सुरक्षा वाढवली आहे.

Namdeo Kumbhar

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील घराला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली.

  • फोन एका अनोळखी व्यक्तीकडून आल्यामुळे खळबळ उडाली.

  • पोलिसांनी दोन्ही निवासस्थानांची कसून तपासणी केली, कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नाही.

  • सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला असून, परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनधी

Bomb Threat to Nitin Gadkari’s Nagpur Residence Sparks Panic : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारा फोन एका अनोळखी व्यक्तीकडून आल्याने उपराजधानीत खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर नागपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तपासणी केली. गडकरी यांच्या महाल आणि वर्धा रोडवरील निवासस्थानाची पोलिसांनी कसून तपासणी केली. पण, तपासणीत कोणताही संशयास्पद वस्तू किंवा पुरावा आढळला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडकरी यांचं घर उडवून देण्याच्या धमकीचा फोन आल्यानंतर तात्काळ सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीचे लोकेशन शोधण्यासाठी तांत्रिक तपास सुरू आहे. यापूर्वीही २०२३ मध्ये गडकरी यांना बेळगाव कारागृहातील कैदी जयेश पुजारी याने खंडणीसाठी धमकी दिली होती. त्यावेळी या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) देखील सहभागी झाली होती. सध्या पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा या नव्या धमकीच्या मुळाशी जाण्यासाठी सखोल तपास करत आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी रात्री फोन वरून देण्यात आली होती. पोलिसांनी धमकीचा कॉल करणाऱ्याला अटक केल्याची प्रथमिक माहिती मिळाली आहे. पोलीस कंट्रोल रूमला रात्री कॉल करून धमकी दिली होती.

प्रताप नगर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा फोन नेमका कोणता घराला उडवून देण्यासाठी आला होता हे स्पष्ट नसल्याने, पोलिसांनी नागपुराय वर्धा रोड आणि महाल परिसरात बांधकाम सुरू असलेल्या घराची सुद्धा तपासणी करण्यात आली. पण यात काहीच मिळून आलं नाही.

कुणी दिली धमकी ?

उमेश राऊत असं अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव आहे. हा कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत भाड्याने राहतो.. त्याच्यासोबत त्याचा मित्र रूम पार्टनर म्हणून सुद्धा राहतो. हे दोघेही मेडिकल चौकातील एका देशी दारूच्या भट्टीवर काम करतात. उमेश राऊत नामक व्यक्तीच्या कॉल आल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. त्याने माझा फोन माझ्या मित्राने घेतला होता. त्याने कोणाला कॉल लावला याची माहिती नसल्याचा पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी मात्र खबरदारी म्हणून या सगळ्या प्रकरणाचा आणखी तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Street Food : भारतातले हेल्दी Top 8 फुड्स कोणते? नाव वाचताच तोंडाला सुटेल पाणी

Maharashtra Live News Update : मुंबईच्या सांताक्रुझ पश्चिम परिसरात मोठा अपघात

landslide : २० सेकंदात होत्याचं नव्हते झालं, गावावर दरड कोसळली, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

Maratha leader Manoj Jarange Patil : आंदोलनात सहभागी न होणाऱ्या नेत्यांना पुन्हा इशारा, नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे?

WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपचा नवीन फीचर! नॉन-व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सशीही चॅट करणं शक्य

SCROLL FOR NEXT