बॉलिवुडने संवेदनशील व्हावं, मदत कार्याला हातभार लावावा - अमेय खोपकर Saam Tv News
महाराष्ट्र

बॉलिवुडने संवेदनशील व्हावं, मदत कार्याला हातभार लावावा - अमेय खोपकर

माझ्याच राज्यात राहून मोठं झालेल्या बड्या बॉलीवूड ताऱ्यांनी थोडं संवेदनशील व्हावं आणि मदतकार्याला हातभार लावावा असं जाहीर आवाहन अमेय खोपकर यांनी केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाावसानं थैमान घातलं आहे. (flood in maharashtra) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापुर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांच्या काही भागात आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. एनडीआरएफ, (NDRF) सैन्य, (Army) नौदल, (Navy) हवाई दल (Air force) यांच्यामार्फत बचावकार्य सुरु आहे. स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था (NGO's) यादेखील मदतकार्यात उतरल्या आहेत. पुराची भीषणता पाहता अजूनही मदतीची गरज आहेच. यासाठी महाराष्ट्रभरातून अत्यावश्यक वस्तूंची मदत करण्यात येत आहे. यात बॉलिवुड मात्र उदासीन दिसतेय. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी बॉलिवुडला (Bollywood) खडेबोल सुनावले आहेत. (Bollywood should be sensitive and help the flood victims said Ameya Khopkar)

काय म्हणाले अमेय खोपकर?

इतर राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर बॉलीवूडमधून मदतीसाठी अनेकजण पुढे येतात. माझ्या राज्यात पूर आल्यानंतर एकाही कलाकाराला साधं ट्विटही करावंसं वाटत नाही, याचं आश्चर्य वाटतं. अनेक स्वयंसेवी संस्थांनी मदतकार्य सुरु केलेलं आहे. आमचे महाराष्ट्र सैनिकही झटतायत. अशावेळी माझ्याच राज्यात राहून मोठं झालेल्या बड्या बॉलीवूड ताऱ्यांनी थोडं संवेदनशील व्हावं आणि मदतकार्याला हातभार लावावा असं जाहीर आवाहन करतो.

हे देखील पहा -

दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महाड (mahad) येथे भेट देऊन पूरग्रस्त परिस्थीची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांकडून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह राज्यातील इतर पुरग्रस्त आणि दुर्घटनाग्रस्त जिल्ह्यांना आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी प्रत्येकी दोन कोटी रुपयांची तर अन्य जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. महाड तालुक्यातील तळिये येथील दुर्घटनेची त्यांनी पाहणी केली आणि संवेदना व्यक्त केल्या.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर?

Vidhan Sabha Election Results : सुरुवातीच्या कलात भाजपने गाठलं शतक!

Naga Chaitanya Birthday : नागा चैतन्य 'या' अभिनेत्रीला किस करताना घाबरला, स्वतः सांगितला होता किस्सा

Assembly Result : काही तरी मोठी गडबड आहे, महाराष्ट्राच्या सध्याच्या निकालावर ठाकरे गटाच्या नेत्याला शंका

Tanvi Mundle Age: मराठमोळ्या अभिनेत्रीचं खरं वय किती, प्रसिद्ध मालिकेत करतेय काम

SCROLL FOR NEXT