hit and run in boisar  saam tv
महाराष्ट्र

Hit And Run : तरुणाला जोरदार धडक देत फरफटत नेले, कारचालक फरार

Hit And Run Accident In Boisar : बोईसर येथे एक भयानक अपघात झाला आहे,ज्यामध्ये तरुणाला धडक देऊन फरफटत नेले आहे.

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

बोईसर: राज्यात दिवसागणिक हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. विशेषतः मुंबईसह संपूर्ण राज्यात अपघातांचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, बोईसरमध्ये आणखी एक हिट अँड रनची गंभीर घटना घडली आहे, ज्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.बोईसर एमआयडीसी परिसरात १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता एक भीषण अपघात घडला. मधुर नाका ते मुकुट नाका रोडवरील पी. डी. मोटर्ससमोर समृद्ध फार्मा कंपनीत काम करणारे मच्छिंद्र बागल हे पायी जात असताना, एका भरधाव वेगाने येणाऱ्या सिल्वर रंगाच्या वॅगनार कारने त्यांना जोरदार धडक दिली.

धडकेनंतर बागल रस्त्यावर पडले, मात्र कारचालकाने गाडी न थांबवता त्यांना फरफटत नेले आणि कारच्या चाकाखाली घेतले. या अपघातात बागल गंभीर जखमी झाले असून, त्यांना त्वरित संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावर न थांबता पलायन केले. त्याने जखमीला मदत न करता पोलीस ठाण्यात माहितीही दिली नाही.बोईसर पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याच्या शोधासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेची सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT