Shirsala Police Station- Beed Saam TV
महाराष्ट्र

Beed: 70 वर्षीय वृद्धाचा शीर तुटलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, परिसरात खळबळ

13 जानेवारीपासून मारुती उगले हे बेपत्ता होते.

विनोद जिरे

बीड: एका सत्तर वर्षीय व्यक्तीचे शीर तुटलेल्या अवस्थेतले धड आढळून आल्याने, बीडच्या (Beed- Parali) परळी तालुक्यातील हिवरा गोवर्धन गावात खळबळ उडाली आहे. मारुती नामदेव उगले वय 70 रा.हिवरा गोवर्धन ता. परळी असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. 13 जानेवारीपासून मारुती उगले हे बेपत्ता होते, घरातील व्यक्तींसह नातेवाईकांनी शोध घेतला परंतु ते दिसुन आले नाही. तर काल सायंकाळी उशिरा उगले वस्ती जवळील त्यांच्या शेतातचं त्यांचे शीर तुटलेल्या अवस्थेतले प्रेत एका व्यक्तीच्या निदर्शनास आले. तर या घटनेची माहिती समजताच सिरसाळा पोलीसांना समजताच पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे घटनास्थळी दाखल झाले होते.

दरम्यान पोलिसांनी (Police) घटनास्थळाची पहाणी करत, मृतदेह रात्री अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला आहे. तर मयताचे मुंडके शोधून देखील पोलीस प्रशासनास सापडले नाही. त्यामुळं नेमका हा मृत्यू कशामुळे झाला? हा घात आहे की अपघात? हे शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान या घटनेची सिरसाळा पोलीस ठाण्यात नोंद झाली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

Maharashtra Politics: आपल्या मालकासमोर काल एक जण 'जय गुजरात' म्हणाला, ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल|VIDEO

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

SCROLL FOR NEXT