TRAGEDY IN BEED! TWO GIRLS DIE AFTER BOAT CAPSIZES IN HINGANI LAKE saam tv
महाराष्ट्र

बीडमधील हिंगणी तलावात होडी उलटली; दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू

Boat Overturns in Hingani Lake : धारूर तालुक्यातील हिंगणी तलावात होडी उलटल्याने दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तलावाच्या काठावर असलेल्या मुलींनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत तिघींना पाण्याबाहेर काढले.

Bharat Jadhav

  • बीडच्या हिंगणी तलावात होडी उलटल्याची दुर्घटना.

  • दोन मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू.

  • मासेमारी करणाऱ्या कुटुंबातील मुली पोहण्यासाठी गेल्या होत्या.

बीडमधील धारूर तालुक्यात असलेल्या हिंगणी तलावात होडी उलटल्याची घटना घडली असून यात दोन मुलींचा पाण्यातू बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना साडेदहाच्या सुमारास घडली. या मुलींचे कुटुंबीय मासेमारीचा व्यवसाय करतात. हाती आलेल्या माहितीनुसार, मासेमारी व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील ५ मुली हिंगणी तलावात पोहण्यासाठी गेल्या होत्या.

हिंगणी येथील पारवे कुटुंबातील पलक शामराव पारवे, दिव्या विकास कांबळे, मोहिनी भीमराव पारवे, तन्वी कोंडीराम पारवे, जानवी कोंडीराम पारवे या मुली हिंगणीचा तलावावर शनिवारी सकाळी पोहण्यास गेल्या होत्या. तिथे असलेल्या मासे पकडण्याच्या होडीवर पलक, दिव्या व मोहिनी या तिघीजण बसल्या.

होडी तलावाच्या आत गेल्यावर होडी अचानक उलटली त्यात तिघीही पाण्यात बुडाल्या. यात मोहिनीला पोहता येत होते. पलक व दिव्या या दोघींनी तिला पकडल्याने तीही पाण्यात बुडाली. तळ्याच्या काठावर असलेल्या मुलींनी आरडाओरडा केल्याने स्थानिकांनी घटनास्थळावर धाव घेत तिघींना बेशुद्ध अवस्थेत पाण्यातून बाहेर काढले.

यात मोहिनीला शुद्ध आली असून पलक शामराव पारवे (वय 14, रा.हिंगणी) दिव्या विकास कांबळे रा. कासारवाडी ता.परळी) यांना अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर हिंगणी गावात शोककळा पसरली.

टेंभापुरी धरणात तिघांचा बुडून मृत्यू

वाळूज जवळील टेंभापुरी मध्यम प्रकल्प परिसरात अवैध मुरूम उत्खननामुळे तयार झालेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून ३ तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना कामगार दिनाच्या सुटीदिवशी घडली होती. १ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या ही दुर्घटना घडली. या धरणात आणि परिसरातील खड्ड्यांत बुडून वर्षभरात तब्बल नऊ जणांचा बळी गेला असून, प्रशासनाच्या सुस्त कारभारावर आता तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'कॉक्रोच'वर दंगलीचा आरोप? व्हीआयपींच्या गाडीवर दगडफेक? काय आहे व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य?

टेन्शन वाढलं! तुमच्या LICचे 350 कोटी बुडणार? देशात 15 लाख कोटींचा महाघोटाळा?

Pune News: पुण्यात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, आई- वडील अन् मुलाचा दुर्दैवी मृत्यू

कोकणात ठाकरेसेना नामशेष? कोकणात ठाकरेसेनेला गळती सुरूच

कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीत आंदोलन, जेन-झींच्या आंदोलनाला परवानगी मिळणार?

SCROLL FOR NEXT