Akola News जयेश गावंडे
महाराष्ट्र

गरीबाच्या ताटातील तांदूळाचा काळाबाजार; पोलिसांनी केली कारवाई

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.

अॅड. जयेश गावंडे

अकोला - रास्त भाव दुकानातील 40 पोते तांदूळ काळ्या बाजारात (Black Market) विक्रीसाठी नेण्यात येत असताना पकडल्याने रेशन दुकानातील काळा धंदा पुन्हा एकदा उजेडात आला आहे. हा तांदूळ काळ्या बाजारात विक्री करताना अकोल्यातील त्रिमूर्ती नगर मध्ये पोलिसांनी (Police) नाकाबंदी करत पकडला. या कारवाईमुळे गरिबांसाठी शासनातर्फे रेशन दुकानातून तांदूळ, गहू व इतर जीवनावश्‍य वस्तू लाभार्थींना न देता रेशन दुकानदारांकडून हे धान्य काळ्या बाजारात विकले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

हे देखील पहा -

अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस ठाण्याच्या परिसरात रेशनच्या तांदुळाचा काळाबाजार होत असल्याचे माहीतीवरुन पोलिसांनी नाकाबन्दी केली असता, चारचाकी गाडीमध्ये आरोपी मोहम्मद काशिद मोहम्मद यूसुफ 40 पोते तांदूळ सुमारे 18 क्विंटल राशनचा तांदूळ बिनापरवाना ताब्यात बाळगून काळाबजार करून विक्री करण्याच्या उद्देशाने नेत असताना मिळून आला.

पोलिसांनी या आरोपिकडून मुद्देमाल जप्त करत आरोपी विरुद्ध पोलिस स्टेशन माना येथे जीवनावश्यक वस्तु अधिनियम कलम 3,7 अनवये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. दरम्यान अशा घटना अनेकवेळा घडूनही प्रशासनाचेही या घटनांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

Maharashtra News Live Update:लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई अन् जिंकली मॅरेथॉनची ‘दौड’

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

Indian Railways: भारतातील ही 3 स्टेशनं मानली जातात सर्वात घाणेरडी, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन आहे का यादीत?

NCMC Card : आजपासून नियम बदलला! 'या' महिलांचा अर्ध्या तिकिटाचा प्रवास बंद; घ्यावे लागणार पूर्ण तिकीट, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT