Shivsena-BJP
Shivsena-BJP Saam TV
महाराष्ट्र

'आम्ही शिवसेनाला मोजत नाही, मानत नाही'; निकालानंतर भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची प्रतिक्रिया

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

औरंगाबाद : शिवसेना (Shivena) काही महाराष्ट्रातला मुख्य पक्ष आहे, असंही काही नाही. महाराष्ट्रातील जनतेला धोका देऊन शिवसेनेने सरकार बनवलं. आता त्यांना अखिल भारतीय पक्ष व्हायचे आहे. पण आम्ही शिवसेना मोजत नाही, शिवसेनेला मानत नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजपाचे नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दिली आहे. इतकंच नाही तर या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला आपलं डिपॉझिट ही वाचवता आलं नाही अशी बोचरी प्रतिक्रिया त्यांनी दिलीयं.

गुजरातमध्ये निवडणुका झाल्या तिथेही शिवसेनेने उमेदवार उभे केले होते. यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये (UP) गोव्यामध्येही (Goa) शिवसेनेने उमेदवार उभे केले होते. याही निवडणुकीत सगळीकडे शिवसेनेने उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांना त्यांचं डिपॉझिट वाचवता आले नाही. शिवसेना केवळ भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विरोधासाठी उभे राहते, अशी शिवसेनेची प्रतिमा अन्य राज्यांमध्ये झाली असल्याचे दानवे म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Loksabha News: सांगलीचा 'भावी खासदार' कोण? बुलेट, युनिकॉर्नची पैज आली अंगलट; दोघांवर गुन्हा दाखल

ATM Crime : चोरट्यांनी एटीएम मशीनच लांबविली; चोरट्यांनी अगोदर फोडला सीसीटीव्ही

Health Tips: मसाल्यामधील धणे जीरे खाण्याचे आश्चर्यचकित करणारे फायदे

Raw Banana Benefits: हिरवीगार कच्ची केळी खाण्याचे फायदे माहित आहेत का?

Today's Marathi News Live: शरद पवार, उद्धव ठाकरेंकडे पाठिंबा मागण्याची वेळ येणार नाही, रावसाहेब दानवेंचं विधान

SCROLL FOR NEXT