jayant patil on BJP Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीत भाजप ५० जागांच्यावर जाणार नाही, शरद पवार गटाचा दावा

Maharashtra Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप ५० जागांपेक्ष अधिक जागा जंकू शकणार नाही, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

''दोन महिन्यात निवडणुका होण्याचा अंदाज आहे. सरकारमध्ये निवडणूक घेण्याचे धाडस नाही. भारतीय जनता पक्ष ५० जागांच्यावर जाणार नाही'', असा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा जळगावमध्ये दाखल झाली आहे. यावेळी येथील चाळीसगाव येथे झालेल्या सभेत ते असं म्हणाले आहेत.

म्हणून त्यांनी मविआ सरकार पडलं..

यावेळी बोलताना जयण्मात पाटील म्हणाले की, ''महायुतीच्या सरकारमध्ये मतमतांतर आहेत. अजून निवडणुकांसाठी दोन-चार महिने काढता येतील का? असं काही षडयंत्र सुरू आहे.'' ते म्हणाले, ''बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडण्याचा पाप त्यांनी केलं. आम्ही पाठिंबा देतो तुम्ही मुख्यमंत्री व्हा, पण उद्धव ठाकरे यांचा सरकार खेचा त्याची गरज भाजपाला का पडली? हे जर पाच वर्षे राहिले, तर आपले काही खरं नाही. या भयातून त्यांनी आमच्या सरकार पाडलं.''

जयंत पाटील म्हणाले, ''एका वर्षात राष्ट्रवादी फोडण्याचा पाप देखील भाजपने केलं. महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष फोडले. याचा महाराष्ट्रातील जनतेच्या मनात प्रचंड राग आहे. जनता वाट पाहत आहे, कधी हे मैदानात उतरतात व कधी यांचा सुपडा साफ करायचा. घटनेने पक्षांतर होणे असे कायदे केलेले असताना पहिल्या मार्गाने दुसरा देखील पक्ष फोडणे. त्याचं हेरिंग न होणं, हे भारतीय जनता पक्षाचे पाप आहे.

'त्रिकुटांच्या सरकारचा जनतेमध्ये प्रचंड रोष'

ते म्हणाले, ''भाजपवाले खाजगीत असं आता सांगतात की, आमची काही सत्ता येणार नाही. त्रिकुटांच्या सरकारचा जनतेमध्ये प्रचंड रोष आहे.'' पाटील म्हणाले, ''आमचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातल्या महिला भगिनींच्या केसालाही धक्का लावण्याचे धाडस कोणी करू शकणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने जाहीरनाम्यात आम्ही समोर येऊ. आमच्या सरकार आल्यास शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ. शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याचं काम निवडून आल्यावर आमचं सरकार करेल.''

जयंत पाटील पुढे म्हणाले की, ''दोन महिन्याच्या काळात ज्या जातीय दंगली घडवण्याच्या प्रयत्नात हे सरकार आहे. महायुती सरकारचे सर्व प्रयत्न संपलेले आहेत. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातून यांनी पैसे खाल्ले. पैसे खाल्ले ते खाल्ले मात्र पुतळा पडला. महाराष्ट्राचा स्वाभिमान पाडण्याचा काम या सरकारने केलं. ही घटना महाराष्ट्रातली जनता कधीही विसरणार नाही, याचा प्रायश्चित्त होणार. नो माफी, याची शिक्षा विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या सर्व आमदारांना देण्याचं काम तुम्हाला करायचं आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card Update: आधार कार्ड मोफत अपडेट करा; मुदत वाढली; शेवटची तारीख कधी?

Maharashtra Weather Update : दुपारी उन्हाचा चटका, पहाटे गारठा, वाचा राज्यातील हवामानाचा अंदाज

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

SCROLL FOR NEXT