भाजपाचा राज्यसरकारला इशारा; दोन दिवसांत मंदिरे उघडा अन्यथा...   saam tv nesws
महाराष्ट्र

भाजपाचा राज्यसरकारला इशारा; दोन दिवसांत मंदिरे उघडा अन्यथा...

ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी, आमदारांनी, कार्यकर्त्यांनी कोरोनाविरोधातील अमृत प्राशन केलय का ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात दोन दिवसांनी श्रावण महिना (Shrawan) सुरु होत आहे. मात्र राज्यातील मंदिरे अद्याप बंद आहेत. या पार्श्वभुमीवर भाजपाचे (BJP Maharashtra) आचार्य तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी राज्य सरकारला दोन दिवसात मंदिरे (Temples) खुली करण्याची मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी मंदिरे खुली न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. (BJP warns state government; Open temples in two days, otherwise ...)

महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi alliance) त्यांची जुलमी सत्ता आता मंदिरातही राबवायला सुरुवात केली आहे. कारण सर्वसामान्य भक्तांसाठी बंद असलेली मंदिरे सत्तेतील मस्तवाल लोकांसाठी उघडली जातात. आधी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) आणि आता आमदार सुनील शेळके. मला या ठाकरे सरकारला प्रश्न विचारायचा आहे की, तुमच्या मंत्र्यांनी, आमदारांनी, कार्यकर्त्यांनी कोरोनाविरोधातील अमृत प्राशन केलय का, असा सवाल तुषार भोसले यांनी केला आहे. त्याचबरोबर दोन दिवसांत श्रावण महिना सुरु होत आहे, मात्र राज्यसरकारने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे राज्यसरकारने दोन दिवसात मंदिरे उघडण्याला निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही राज्यात आंदोनाची राळ उठवू, असा इशारा भोसले यांनी दिला आहे.

हे देखील पहा-

दरम्यान दोन दिवसांपुर्वीची त्यांनी मंदिरे खुली करण्याच्या मुद्द्यावरुन राज्यसरकारवर निषाणा साधला होता. त्यावेळीदेखील त्यांनी मंदिरे खुली करण्यासाठी राज्यसरकारच्या हातात लकवा भरतो, अशी खोचक टिका केली होती. ब्रेक द चेन अंतर्गत राज्यसरकारने राज्यातील २३ जिल्ह्यातील निर्बंध शिथील केले आहेत. तर ११ जिल्ह्यातील अद्याप निर्बंध कायम आहेत. ज्या २३ जिल्ह्यात निर्बंध शिथील केले आहेत, तेथील व्यवहारदेखील पुर्ववत केले आहेत. मात्र राज्यातील मंदिरे अद्याप बंदच ठेवण्यात येणारआहेत, यावरुन मंदिरे खुली कऱण्यासाठी राज्यसरकारच्या हातात लकवा मारतो, अशी घणाघाती टिका तुषार भोसले यांनी केली होती.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध क्रिकेटपटूची राजकारणात एण्ट्री; हाती घेतलं कमळ,भाजपमध्ये सामील होताच मिळाली मोठी जबाबदारी

Pune News : पुण्यात भाजपला धक्का! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राजकारणात मोठी घडामोड

फालतू भानगडी करताय! भाजपला संपवायला निघाले का? सुधीर मुनगंटीवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

SCROLL FOR NEXT