Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

BJP On Uddhav Thackeray: 'नादी लागला तर सोडत नाही', देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ शेअर करत भाजपचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा

Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray: आज मुंबईतील रंग शारदा येथे ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. यालाच आता भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे.

Satish Kengar

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सगळेच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. यातच आज शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी आज भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटाकडून मुंबईतील रंग शारदा येथे कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना फडणवीस यांचं नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणाले की, 'एक तर तू राहशील, नाहीतर मी.' यालाच आता भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई भाजपने सोशल मीडिया साईट X वर देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ शेअर करत उद्धव ठाकरे यांना थेट इशाराच दिला आहे. या व्हिडिओत देवेंद्र फडणवीस आपल्या विरोधकांना इशारा देत बोलताना दिसत आहेत की, ''मी कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणी नादी लागलं, तर सोडत नाही.'' मुंबई भाजपचा हा व्हिडिओ आता भाजप नेते आणि कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केल्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र भाजपच्या X अकॉउंटवरूनही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत X अकॉउंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे, ज्यात लिहिण्यात आलं आहे की, ''उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला लागलेले कलंक आहेत.

यात पुढे लिहिण्यात आलं आहे की, ''स्वर्गीय हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देऊन विशिष्ट व्होट बँकच्या जीवावर पोकळ धमक्या देणं बंद करा. महाराष्ट्राने तुमचं औरंगजेब प्रेम पाहिलं आहे, मतांसाठी लाचार झालेले, तुम्ही हिंदुत्वाची कसली भाषा करता.''

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. दरेकर म्हणाले आहेत की, ''मराठवाड्यामध्ये २० हजार कोटींची गुंतवणूक आणली गेली आणि त्याचे प्रसारमाध्यमांत कौतुक होईल, म्हणून गुंतवणुकीवरून लक्ष विचलित करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक केलेले हे वक्तव्य आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

Maharashtra News Live Update: महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल - मंत्री संजय शिरसाट

Mumbai Crime: भयानक ! पत्नीला ४ तास 'कोंबडा' बनवून अमानुष मारहाण; तडीपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Marathi Serial: 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; खासदार अमोल कोल्हेंनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT