Bhavana Gawli News संजय राठोड
महाराष्ट्र

"खासदार दाखवा बक्षीस मिळवा" शहरात शिवसेनेच्या खासदार भावना गवळी विरोधात भाजपची पोस्टरबाजी

शिवसेनेने विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शिवसंपर्क अभियान सुरु केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ: शिवसेनेने विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शिवसंपर्क अभियान सुरु केले आहे. मात्र, यवतमाळ- वाशिम मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) या गेल्या ६ महिन्यांपासून मतदारसंघामध्ये फिरकले देखील नाहीत. नागरिकांनी कोणाकडे आपल्या अडचणी मांडायच्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच शिवसंपर्क अभियानापासून देखील त्या दूर आहेत. यामुळे भारतीय जनता पार्टीकडून (BJP) खासदार भावना गवळी यांना दाखवा आणि बक्षीस मिळवा, असे बॅनर (Banner) शहरामधील एलआयसी चौकामध्ये लावण्यात आले आहे. बॅनरवर काहीसा चांगलाच मजकूर लावून खासदार भावना गवळी यांना शोधून आणणाऱ्यास बक्षीस देण्याचे भाजपकडून जाहीर करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

ईडीच्या (ED) समन्सनंतर भावना गवळी सार्वजनिक पटलावरुन दूर झाले आहेत. मनी लाँड्रिंग (Money laundering), विविध संस्थांमधील घोटाळ्यांच्या संबंधित कागदपत्रे आणि पुरावे, हरीश सारडा नामक त्यांच्या विरोधकाने ईडीला सुपूर्त करण्यात आले आहे. यानंतर वाशिम (Washim) बरोबरच इतर काही ठिकाणी धाडी देखील पडले आहेत. त्यातच त्यांचे निकटवर्तीय सईद खान यांना ईडीने २७ सप्टेंबर २०२१ दिवशी मुंबईमधून अटक केली आणि भावना गवळींचे आयुष्य बदले आहे. ईडीचे समन्स आल्यापासून खासदार भावना गवळी अचानक सार्वजनिक पटलावरुन दूर झाल्यासारखा झाले आहे. आपल्या मतदारसंघामध्ये खुल्या पद्धतीने त्या कार्यकर्त्यांना भेटल्या तो दिवस म्हणजे २७ सप्टेंबर २०२१ हा होता.

यानंतर ३- ४ दिवसामध्येच भावना गवळींना ईडीचे पहिले समन पाठविण्यात आले होते. आतापर्यंत ईडीने ४ वेळा भावना गवळींना समन्स जारी केले आहेत. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळे त्या अजून एकदा देखील ईडीला सामोरे गेले नाहीत. पहिले त्यांची तब्येत खराब असल्याचे त्यांनी कळवले होते, त्यांना चिकन गुनिया झाला होता तर नंतर संसदेचे सत्र सुरु असल्यामुळे त्या ईडीसमोर उपस्थित झाले नाही. अनिल देशमुख यांच्याप्रमाणे आप ही ईडीसमोर गेल्यास अटक होईल का? याची टांगती तलवार राहणार आहे. जाहीर कार्यक्रम जरी त्या घेत नसले तरी संसदेत त्या आताही येत आहेत.

मात्र, फारशा सक्रिय दिसत नाहीत. एकीकडे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहणार हे त्यांनीच जरी उद्धव ठाकरेंना कळवले असले, तरी दुसरीकडे काही महिने अगोदर अत्यंत नाराजीने कंत्राटदारांना गवळी काम करु देत नसल्याची तक्रार त्यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरेंना केली होती. यामुळे ही ठाकरेंची त्यांच्यावर नाराजी असल्याचे कळते आणि त्यामध्ये आता ईडीने भर घातली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

SCROLL FOR NEXT