काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल, या डायलॉगमुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका भाजप पदाधिकाऱ्याने चक्क शहाजीबापूंचे पाय धुवून पाणी पिणार असा पन केला आहे. या "पनाची"सोलापूर जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
डॉ. विजय बाबर असं पन करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याचं नाव आहे. ते भाजपचे सोलापूर जिल्हा सचिव आहेत. दुष्काळी सांगोला तालुक्यातील माण नदीमध्ये टेंभू उपसा सिंचन योजनेतून 600 एमसीएफटी पाणी सोडण्यास मंजुरी मिळाली आहे.
त्यामुळे लवकरच माण नदीत पाणी येणार आहे. याच माणनदीच्या पाण्याने आमदार शहाजी पाटील यांचे पाय धुवून पाणी पिणार असल्याचं डॉ विजय बाबर यांनी जाहीर केले आहे. माण नदीमध्ये पाणी सोडावे या मागणीसाठी विजय बाबर यांनी अनेक आंदोलने, मेळावे घेतले होते.
सांगोला तहसील कार्यालयासमोर 200 जनावरांसह 27 दिवस उपोषण देखील केले होते. शेतकऱ्यांच्या या मागणीनंतर आमदार शहाजी पाटील यांनी टेंभू योजनेतून माण नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे माण नदीमध्ये पाणी सोडण्याचा नुकताच शासन निर्णय झाला आहे.
त्यामुळे माण नदीत टेंभूचे पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाणी आल्यानंतर माण नदीवरील 17 बंधारे भरणार आहेत. याचा नदीकाठच्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. आमदार शहाजी पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या उपकाराची उतराई म्हणून माणनदीच्या पाण्याने त्याचे पाय धूवून तेच पाणी मी पिणार असल्याचे त्यांनी बाबर यांनी जाहीर केले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.