BJP Maharashtra in-charge and co-in-charge list saam tv
महाराष्ट्र

BJP Prabhari list: भाजपने भाकरी फिरवली! पक्षात मोठा फेरबदल; महाराष्ट्रातील ४ नेत्यांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी

BJP Releases New Prabhari List: भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रभारी आणि सहप्रभारींच्या नियुक्त्यांमध्ये मोठे फेरबदल केलेत. महाराष्ट्रासाठी नव्या प्रभारी टीम जाहीर करण्यात आलीय.

Bharat Jadhav

  • भाजपने राज्य प्रभारी आणि सहप्रभारींच्या नियुक्त्यांमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल केला

  • नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली या नव्या नियुक्त्या जाहीर

  • महाराष्ट्राची जबाबदारी बैजयंत जय पांडा यांच्याकडे सोपवण्यात आली

गेल्या काही दिवसांमध्ये देशातील राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडत आहेत. नितीन नवीन यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून राष्ट्रीय पातळीवर पक्षसंघटनेत अनेक बदल केले जात आहेत. आगामी विधानसभा निवडणूक आणि 2029 सालची लोकसभा निवडणूक लक्षात घेत भाजपने पक्षसंघटनेत महत्त्वाचे बदल केलेत. भाजपने नवीन प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर केलीय.

यात उत्तर प्रदेश आणि पंजाबसारख्या राज्यांचा समावेश आहे. काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेशसाठी प्रभारी म्हणून विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे,तर जगदीश पटेल, मेधा कुलकर्णी, डॉ. प्रदीप वर्मा आणि अनंत ओझा यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील चार नेत्यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.

यात विनय सहस्त्रबुद्धे यांची दिल्ली भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. तर विनोद तावडे हे उत्तर प्रदेश आणि भारती पवार या गोवा राज्याच्या प्रभारी असणारआहेत. तर पुण्यातील चर्चेत असणाऱ्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर उत्तर प्रदेशचे सहप्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आलीय.

महाराष्ट्र भाजपचे प्रभारी म्हणून राज्यसभा खासदार बैजयंत पांडा यांची नियुक्ती करण्यात आलीय. तसेच हरीश द्विवेदी यांची कर्नाटक आणि बिहारचे प्रभारी, स्मृती इराणी यांना छत्तीसगढ आणि हरियाणा, तरुण चुग यांच्याकडे गुजरात, श्रीकांत शर्मा यांच्याकडे हिमाचलचे प्रभारीपद, राम माधव यांना उत्तराखंडचे प्रभारी करण्यात आले आहे.

काही दिवसापूर्वीच भाजपच्या संघटनेत अनेक तरुण नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातून विनोद तावडे यांच्यावर सातत्याने पक्षनेतृत्त्व आणि संघटनेकडून विश्वास दाखवण्यात आल्याचे दिसून आले आहे.

BJP News: भाजपच्या प्रभारी आणि सहप्रभारींची राज्यनिहाय यादी खालीलप्रमाणे

1. अंदमान & निकोबार

प्रभारी - श्री जय प्रकाश, दिल्ली

2. अरुणाचल प्रदेश

प्रभारी - डॉ. देवेश कुमार, बिहार

3. आंध्र प्रदेश

प्रभारी - डॉ. अरविंद भदौरिया

सह प्रभारी - श्रीमती वनथी श्रीनिवासन

4. असम

प्रभारी - श्री मंगल पांडे

सह प्रभारी - श्रीमती फांग्नोन कोन्याक

सह प्रभारी - श्री मनोज टिंग्गा

5. बिहार

प्रभारी - श्री हरीश द्विवेदी

सह प्रभारी - श्रीमती संगीता यादव

सह प्रभारी - श्री रोहन गुप्ता

6. चंडीगढ़

प्रभारी - श्री महेंद्र पांडे

7. छत्तीसगढ़

प्रभारी - श्रीमती स्मृति ईरानी

सह प्रभारी - श्री सिद्धार्थ शम्भू

8. दादरा नगर हवेली & दमन एवं दीव

प्रभारी - श्रीमती वर्षाबेन नरेंद्रभाई दोशी

9. दिल्ली

प्रभारी - डॉ. विनय सहस्रबुद्धे

सह प्रभारी - श्री जामयांग त्सेरिंग नामग्याल

सह प्रभारी - श्रीमती दर्शानाबेन जरदोश

10. गोवा

प्रभारी - डॉ. भारती प्रवीन पवार

सह प्रभारी - श्री अनिल एंटनी

11. गुजरात

प्रभारी - श्री तरुण चुघ

सह प्रभारी - श्री अजय महावर

सह प्रभारी - श्रीमती गोमती साई

12. हरियाणा

प्रभारी - श्रीमती स्मृति ईरानी

सह प्रभारी - डॉ. भोला सिंह

13. हिमाचल प्रदेश

प्रभारी - श्री श्रीकांत शर्मा

सह प्रभारी - श्रीमती दर्शना सिंह

14. जम्मू & कश्मीर

प्रभारी - डॉ. सतीश पूनिया

सह प्रभारी - श्रीमती रीना कश्यप, हिमाचल प्रदेश

15. झारखंड

प्रभारी - श्री गजेंद्र पटेल

सह प्रभारी - श्री सौरभ सिंह

सह प्रभारी - श्रीमती निवेदिता सिंह, बिहार

16. कर्नाटक

प्रभारी - श्री हरीश द्विवेदी

सह प्रभारी - डॉ. के. वेंकटेश्वरलू

17. केरळ

प्रभारी - प्रो. एम. नागराजा

सह प्रभारी - श्री एम. वेंकटेशन

18. लडाख

प्रभारी - श्री राजकुमार भाटिया, दिल्ली

19. लक्षद्वीप

प्रभारी - श्री जॉर्ज कुरियन

20. मध्य प्रदेश

प्रभारी - श्री बबलू कुमार देव

सह प्रभारी - श्रीमती रेखा वर्मा

21. महाराष्ट्र

प्रभारी - श्री बैजयंत जय पांडा

सह प्रभारी - श्री अमित मालवीय

सह प्रभारी - श्री सदानंद शेट तानावडे

सह प्रभारी - श्रीमती कमलजीत सहरावत

22. मणिपुर

प्रभारी - डॉ. राजदीप रॉय

23. मेघालय

प्रभारी - श्री कनाद पुरकायस्थ

सह प्रभारी - डॉ. नुमल मोसमन, असम

24. मिजोरम

प्रभारी - डॉ. भगवत कराड

25. नगालैंड

प्रभारी - श्री अनिल एंटनी

26. ओडिशा

प्रभारी - श्रीमती डी. पुरंदेश्वरी

सह प्रभारी - डॉ. स्वदेश सिंह

27. पुडुचेरी

प्रभारी - श्री के. सुरेंद्रन

28. पंजाब

प्रभारी - डॉ. सतीश पूनिया

सह प्रभारी - श्री वीरेंद्र सचदेवा

सह प्रभारी - श्रीमती (डॉ.) अलका गुर्जर

29. राजस्थान

प्रभारी - श्री संजय भाटिया

सह प्रभारी - श्रीमती कविता पाटीदार

सह प्रभारी - श्री कुलजीत चहल

30. सिक्किम

प्रभारी - श्री राजू बिस्ता

31. तमिलनाडू

प्रभारी - श्री राम माधव

सह प्रभारी - श्री निर्मल कुमार सुराणा

सह प्रभारी - श्रीमती डी. के. अरुणा

32. तेलंगाणा

प्रभारी - श्री सुनील बंसल

सह प्रभारी - श्री अभय पाटिल

सह प्रभारी - श्रीमती रेखा शर्मा

33. त्रिपुरा

प्रभारी - श्री मृगांका देव बर्मन

34. उत्तर प्रदेश

प्रभारी - श्री विनोद तावड़े

सह प्रभारी - श्री जगदीश पटेल

सह प्रभारी - श्रीमती मेधा कुलकर्णी

सह प्रभारी - डॉ. प्रदीप शर्मा

सह प्रभारी - श्री अनंत ओझा

35. उत्तराखंड

प्रभारी - श्री राम माधव

सह प्रभारी - श्री अरविंद मेनन

सह प्रभारी - सुश्री बांसुरी स्वराज

36. पश्चिम बंगाल

प्रभारी - श्री सुनील बंसल

सह प्रभारी - श्री लाल सिंह आर्य

सह प्रभारी - श्री राजेंद्र सिंह, बिहार

सह प्रभारी - श्रीमती पिंकी कुशवाहा, बिहार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wedding Anniversary Gift Ideas: लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जोडीदाराला द्या ‘हे’1 गिफ्ट; नात्यात वाढेल प्रेम

Maharashtra News Live Update: शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

LPG eKYC : LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! e-KYC केली नाही तर होणार आर्थिक नुकसान, जाणून घ्या नवा नियम

Shocking: डॉक्टरच्या निधनाने खळबळ, रुग्णालयातील बाथरुमध्ये आढळला मृतदेह

Diabetes drink: हे तीन घटक एकत्र उकळून प्या; डायबेटीस रूग्णांची वाढलेली साखर झटक्यात येईल कमी

SCROLL FOR NEXT