गेल्या काही दिवसांपासून सोलापूरात चर्चेत असलेल्या ऑपरेशन लोटसचा महत्त्वाचा टप्पा आता पूर्ण होणार आहे... अजितदादांच्या राष्ट्रवादीची साथ सोडत 3 माजी आमदार भाजपात लवकर पक्षप्रवेश करणार आहेत... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या फलटण दौऱ्या दरम्यान तीन बड्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाची वेळ ठरलीय...फलटणमधील विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसोबतच्या पहिल्या रांगेतच माजी आमदार राजन पाटील उपस्थित होते.या कार्यक्रमानंतरच्या बैठकीत पक्षप्रवेशाची तारीख निश्चित करण्यात आली.कोणते माजी आमदार भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत..
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मोहोळचे माजी आमदार यशवंत माने,माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं चित्र आहे... तसचं सोलापूर दक्षिणमधील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या प्रवेशाला भाजपच्या स्थानिक आमदारांनी विरोधक केल्यानं त्याच्या पक्षप्रवेशाला ब्रेक लागलाय...
दुसरीकडे बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनीही भाजपात पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय..ज्यामुळे सोलापूरसह माढ्याच्या राजकारणात
मोठा भूकंप घडणार आहे...2९ ऑक्टोबरला एकाच दिवशी हे चारही माजी आमदार भाजपचं कमळ हाती घेणार असल्याची चर्चा आहे.. मात्र या माजी आमदरांच्या पक्षप्रवेशानं नेमकं जिल्ह्याच्या राजकारणात काय फरक पडणार?
सोलापूर जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे... मोहिते पाटलांसारखे दिग्गज नेते आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रवादीनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलयं.. ज्याच्या हाती सहकारी संस्था त्याच्याकडे सत्तेची चावी हे सोलापुराचं राजकीय गणित राहिलयं... त्यामुळे मोहोळ आणि माढ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे आव्हान उभं करण्यासाठी आणि अजित पवारांना शह देण्यासाठी भाजप ही रणनिती आखत आहे... स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माजी आमदारांच्या पक्षप्रवेशानं भाजपला जिल्ह्यात बळ मिळेल...
दरम्यान सोलापूरात जिल्हा परिषद निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार आहे...त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप माजी आमदारांच्या माध्यमातून विरोधकांपुढे आव्हानं उभं करून जिल्ह्यात भाजपची ताकद वाढणार.. मात्र यामुळे महायुती नव्या वादाला तोंड फुटणार का? हे पाहणं महत्वाचं ठरेल..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.