मंत्री संदीपान भुमरे यांच्या भावाकडून भाजप पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण! SaamTvNews
महाराष्ट्र

मंत्री संदीपान भुमरे यांच्या भावाकडून भाजप पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण!

विशेष म्हणजे मारहाण झालेला भाजप पदाधिकारी मंत्री संदीपान भुमरे यांच्या सख्ख्या मामाचा मुलगा आहे!

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : राज्याचे रोहयो मंत्री संदिपान घुमरे यांचा भाऊ राजू भुमरे यांनी भाजपच्या तालुका उपाध्यक्षाला बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. रस्त्याच्या गैरव्यवहारावर फेसबुक लाईव्ह केल्याच्या रागातून रणजीत नरवडे यांना बेदम मारहाण केली. राजू भुमरे यांच्यासह दहा ते पंधरा लोकांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण केली असल्याचा एक फोटो समोर आलाय. ज्यात मंत्री संदीपान भुमरे यांचा भाऊ हे रणजीत नरवडे यांना खोऱ्याच्या दांड्याने मारताना दिसत आहे. शिवाय इतर काही जण हल्ला करीत असल्याचं दिसतंय. त्यामुळे रणजीत नरवडे यांच्या पाठीवर मारहणीचे वळ उठलेत.

हे देखील पहा :

औरंगाबाद जिल्ह्यातील धुळे-सोलापूर महामार्गापासून ते साजेगाव ते लिंबगाव रस्त्याच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत रणजीत नरवडे आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनारायण भुमरे हे फेसबुक लाईव्ह करत होते. त्याच वेळी राजू घुमरे यांच्यासह काही लोक लाठ्या-काठ्या घेऊन आले. फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर अचानक शिवीगाळ करीत हल्ला करण्यात आला. साजेगाव रस्त्यावर काम न करता पैसे उचलल्याचा नरवडे यांचा यांचा आरोप आहे. मारहाणीनंतर रणजीत नरवडे आणि बद्रीनारायण भुमरे हे तक्रार द्यायला पाचोड पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र, तिथे तक्रार घेतली जात नसल्याचा आरोप बद्रीनारायण भुमरे यांनी केला. त्यानंतर त्यांनी औरंगाबादच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केलीये.

काय आहे प्रकरण :

राज्याचे रोहयोमंत्री संदीपान भुमरे आणि त्यांचे पुत्र विलास भुमरे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून पैठण तालुक्यातील विविध योजनेंतर्गत कोणतेही रस्ते न करता कोट्यवधींचे बोगस बिल काढल्याची तक्रार भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनारायण भुमरे आणि काही जणांनी विभागीय आयुक्तासह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आठ दिवसापुर्वी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन संबधीतांच्या चौकशीचे आदेश देताच सर्वत्र खळबळ उडाली. संबंधीत ठेकेदारांनी बोगस बिले काढलेल्या रस्त्याची रात्री कामे सुरू केली. या बाबीची बद्रीनारायण भुमरे यांना माहीती मिळताच ते बुधवारी साजेगाव -लिंबगाव रस्त्यावर पोहचले व सुरु असलेल्या कामावर फेसबुक लाईव्ह करून बनावटगिरीचा पडदा उघडा करु लागले होते.

फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर लगोलग राज्याचे रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांचे बंधु राजु भुमरे, पुतण्या ( सरपंच) शिवराज भुमरे हे शेकडो समर्थकांसह तेथे दाखल झाले. अन् आम्ही कोणाच्या बापाचे पैसे नाही खाल्ले, कशाला तुम्ही तक्रार करता असे म्हणून शिव्या देऊ लागले. तोच संदीपान भुमरे यांच्या सख्ख्या मामाची मुले रणजित नरवडे व रणवीर नरवडे यांनी तुम्ही बोगस बिल काढले नाही तर तक्रारीनंतर कशाला काम करु लागलात? असे म्हणताच मंत्री भुमरे यांचा भाऊ राजू भुमरे यांनी त्याच्या मामाची मुले रणजीत व रणवीर यांना मारहाण करण्यास सुरवात केली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये EVM आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयडी कार्ड, शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

Anushka Sharma Looks Like: 'वहिनीपेक्षा ही क्युट...'; पाकिस्तानी तरुणी दिसते सेम अनुष्कासारखी, व्हिडिओ पाहून विराटला केलं टॅग

Pune : ठाकरे, पवारांची एकमेकांवर टीका जेवायला मात्र एकत्र असायचे, पण आता...तावडेंनी बोलून दाखवली खंत

Pune Politics: पुण्यात शिंदेगटाला मोठं खिंडार, नाराज पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

अफवांचा खेळ संपला, महाडिकवाडीतील भीतीचं भूत उतरलं, पोलीस-अंनिसने केला सत्याचा उलगडा

SCROLL FOR NEXT