BJP leaders prepare an aggressive Hindutva-focused campaign to counter the Thackeray brothers’ Marathi identity push in the upcoming Mumbai civic elections. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महापालिकेसाठी भाजपचा नवा प्लॅन, ठाकरेंच्या रणनीतीला भाजपचा शह?

Hindutva vs Marathi Identity: मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी भाजपनं नवा मास्टर प्लॅन आखलाय.. भाजपनं आखलेली ही रणनीती नेमकी काय आहे? भाजपच्या नव्या रणनीतीनं ठाकरे बंधूंपुढे कसं आव्हानं निर्माण होतं?

Suprim Maskar

ठाकरे बंधूंच्या युतीनं मुंबई महापालिकेत मराठीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला... मुंबईचा महापौर मराठी होणार, असं जाहीर करून ठाकरेंनी मराठी अस्मितेचा अजेंडा सेट केला... मात्र ठाकरेंच्या याच अजेंड्याला उत्तर देण्यासाठी भाजपनं नवी रणनीती आखलीय...ती रणनीती नेमकी काय आहे?

ठाकरेंच्या मराठीच्या मुद्द्याला भाजप हिंदुत्त्वाच्या अजेंड्यानं आव्हान देणार... मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह आसपासच्या परिसरात हिंदुत्वावर भर देणाऱ्या नेत्यांच्या प्रचारसभा होणार... उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह राज्यातील भाजपाचे नेते मंत्री नितेश राणे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सभाचं आयोजन केलं जाणार...लोकसभा निवडणुकीप्रमाणेच बटेंगे तो कटेंगे हा प्रचार पॅटर्न राबवला जाणार आहे.

मतांच्या धुव्रीकरणासाठी आखला जाणारा हा नवा प्लॅन भाजप नेत्यांच्या विधानातून याआधी अनेकदा उघड झालाय.... 'मराठी-मुस्लिम' फॅक्टरला शह देण्यासाठी महापालिकेत भाजप हिंदी- मराठी ऐवजी फक्त हिंदू मताची मोट बांधणार आहे,..त्यासाठी एक है तो सैफ है यासारख्या घोषणांच्या माध्यमातून हिंदू मताचं विभाजन टाळण्याचा प्रयत्नही भाजपकडून सुरु आहे...आता ठाकरे बंधू आणि कॉग्रेस-वंचितची युती भाजपच्या अजेंडयाला कशी टक्कर देतात? भाजपला रोखण्यासाठी मराठीचा मुद्दा प्रखरतेनं मांडण्यात ठाकरे बंधू यशस्वी होतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election: मुंबई महापालिकेतील महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला, शिंदेसेना ९० जागा तर भाजपला १३७ जागा

Congress-Vanchit Alliance: काँग्रेस वंचित युती, वर्षा गायकवाड नाराज? गायकवाडांनी नाराजीनाट्यावर सोडलं मौन

Pune Corporation Election: पुण्यात काँग्रेसच्या हातात मशाल; काँग्रेस-ठाकरे सेनेचं जागावाटप जाहीर

मुंबईत भीषण अपघाताचा थरार; भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडले, ४ जणांचा मृत्यू

दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं, भाजपला दूर सारत राष्ट्रवादी एकत्र

SCROLL FOR NEXT