Nitesh Rane News Saam Tv
महाराष्ट्र

Nietsh Rane: भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनवर आज हायकोर्टात सुनावणी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीमध्ये शिवसेना कार्यकर्ते संतोष परबयांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या भाजप आमदार नितेश राणे यांनी आता अटकपूर्व जामीनाकरिता उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीमध्ये शिवसेना कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी वादाच्या भोवर्‍यात आडकलेल्या भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी आता अटकपूर्व जामीनाकरिता उच्च न्यायालयामध्ये (court) धाव घेतली आहे. या हल्‍ल्या प्रकरणी सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणेबरोबरच अन्य एकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्या निकाल राणे यांच्यावतीने अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी हायकोर्टात (High Court) आव्हान दिले आहे. (Nitesh Rane Latest News on Bail Hearing)

हे देखील पहा-

त्या अर्जावर न्यायमूर्ती सी.व्ही. भडंग यांच्यासमोर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सुनावणी होणार आहे. विधानभवनाच्या (Vidhan Bhavan) पायऱ्यांवर आदित्य ठाकरेंना म्याँव म्याँव करून चिडवल्यानंतर अवघ्या काही तासामध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे निव्वळ राजकीय (Political) सूडबुद्धीने आणि सरकारचा दबाव असल्यामुळे या प्रकरणामध्ये आपल्याला खेचले जात असल्याचा दावा आमदार नितेश राणे यांनी आपल्या अर्जामध्ये केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक (Sindhudurg District Bank) निवडणूकीच्या रणधुमाळीत सतिश सावंत यांच्या पॅनलचे निवडणूक प्रचारक संतोष परब यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला होता. हा हल्ला आमदार नितेश राणे यांच्या सांगण्यावर झाल्याचा आरोप करून तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी (police) ८ जणांना अटक (Arrested) केल्यावर अटकेची शक्यता निर्माण झाल्याने नितेश राणे आणि गोट्या सावंत यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.

या अर्जावर २ दिवस युक्तीवाद झाल्यावर जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. १८ डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीमध्ये हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या २ जणांनी धारदार चाकूने वार केले होते.

या हल्ल्यामध्ये परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्ली मधून अटक करण्यात यश आले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijaya Divas: 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठीत, आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार'; उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

Raj thackeray: आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #$@डू आहोत असा गैरसमज नको, राज ठाकरे कडाडले

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

SCROLL FOR NEXT