mla nitesh rane, mp sanjay raut, former cm uddhav thackeray saam tv
महाराष्ट्र

Nitesh Rane : उपमुख्यमंत्र्यांनी तोंड उघडले तर ठाकरे कुटुंब आर्थर रोड जेलची हवा खाईल : नितेश राणे (पाहा व्हिडिओ)

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Nitesh Rane News : उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री यांनी ताेंड उघडले तर संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यासह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांचे कुटुंब हे सगळे आर्थर राेड जेलमध्ये (arthur road jail) खडी फाेडताना आम्हांला दिसतील असे भाजप आमदार नितेश राणे (nitesh rane latest marathi news) यांनी नमूद केले. त्यामुळे राऊतांची इच्छा असेल तर त्यांनी येणारी दिवाळी माताेश्रीत साजरी करावी तर जेवढे गप्प बसाल तेवढे चांगले असेही राणेंनी म्हटले. ते सिंधुदूर्ग (sindhudurg) येथे माध्यमांशी बाेलत हाेते. (Maharashtra News)

आमदार नितेश राणे म्हणाले बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेचा चढता आलेख हाेता. महाराष्ट्रात फार माेठी किंमत हाेती. ताे उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीत उबाठा नावाचे एक छोटे मित्रमंडळ हाेऊन बसले आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी देशाच्या अर्थवव्यवस्थेवर लिहिण्यापेक्षा शिवसेनेच्या अवस्थेवर लिहावे असे राणेंनी म्हटले आहे.

ड्रग्ज प्रकरणावर राणेंनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले आदित्य हे दिनोच्या घरी आयुर्वेदिक उपचारासाठी जायचा का? सत्य नारायण पूजेला जायचं का ? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पंढरपूरला पूजा करायला गेले असताना आदित्य ठाकरे मध्येच उठून गेले हाेते. का गेले हाेते. कुठल्या नशेत होते का ? असा सवाल राणेंनी केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुसऱ्यांना बोलण्यापूर्वी तुम्ही काचेच्या घरात राहता हे लक्षात ठेवा असे राणेंनी राऊतांना सुनावले. ते म्हणाले उपमुख्यमंत्र्यांनी अथवा मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडले तर ठाकरे कुटुंब आर्थर रोड जेल मध्ये खडी फाेडताना दिसेल असेही नितेश राणेंनी म्हटले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT