bjp mla narayan kuche car accident update saam tv
महाराष्ट्र

मोठी बातमी ! भाजप आमदाराच्या कारने दुचाकीला दिली धडक, चार जण जखमी

भाजपच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील डोणगाव फाट्याजवळ भाजपचे आमदार नारायण कुचे (Narayan Kuche) यांच्या कारने दुचाकीला धडक (car accident) दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात आज शुक्रवारी झाला असून एकाच कुटुंबातील (four people injured) चार जण जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबड - बदनापूर मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांची कार औरंगाबादच्या दिशेने येत होती. त्यांची कार डोणगाव फाट्यावर वळण घेत होती. त्याचदरम्यान, औरंगाबादकडून येणाऱ्या दुचाकीला कारची धडक बसली. त्यानंतर या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले. त्यानंतर कुचे यांच्या कारमधून जखमींना उपचारासाठी पाचोड येथे नेण्यात आले. त्या रुग्णालयात तेथे प्राथमिक उपचार करून जखमींना औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! पत्नीसोबत उघडा जॉइंट खातं अन् महिन्याला कमवा ₹8,633 रुपये

जुलाब होतायेत? मग दहीसोबत मिसळून खा 'हा' १ पदार्थ

Chronic stress effects: सतत तणाव घेण्याची सवय मेंदू आणि शरीरासाठी का ठरते धोकादायक? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra News Live Update: अरविंद म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेतेचा राजीनामा दिला

Pune : महिलेने यात्रेतून खरेदी केली चादर; घरी जाऊन घडी उलगडताच पायाखालची जमीन सरकली, पाहा नक्की काय घडलं?

SCROLL FOR NEXT