भरत मोहळकर, साम टीव्ही
देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली असली तरी फडणवीसांसोबत शपथ घेणाऱ्या मंत्र्यांच्या नावावरून अजूनही कोंडी कायम आहे. तर शिंदे गटाने उदय सामंतांमार्फत पाठवलेल्या 7 मंत्र्यांपैकी 3 नावांवर भाजपने आक्षेप घेत कलंकित चेहरे मंत्रिमंडळात नको, अशी थेट भूमिका घेतल्याची माहिती सुत्रांनी दिलीय... त्यामुळे शिंदे गटाची कोंडी झालीय...मात्र भाजपने कोणत्या नावांवर आक्षेप घेतलाय? पाहूयात...
1) संजय राठोड
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गंभीर आरोप आणि जलसंधारण मंत्री म्हणून सुमार कामगिरी
2) अब्दूल सत्तार
कृषी आणि अल्पसंख्याक मंत्री असताना त्यांच्या खात्यात घोटाळा झाल्याचा आरोप, तसंच भूखंड लाटल्याचाही आरोप
3) तानाजी सावंत
आरोग्य खात्यात टेंडर महाघोटाळ्याचा आरोप
4) दीपक केसरकर
शालेय शिक्षण विभागाच्या कारभारावर भाजपचा आक्षेप
भाजपने शिंदे गटातील यादीवर आक्षेप घेतला असला तरी शिंदे गटाच्या वादग्रस्त नेत्यांना मंत्रिपदाची आशा आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्वच्छ चेहऱ्यांना संधी देण्याची भाजपची रणनीती आहे. त्यामुळे शिंदे गटाबरोबरच अजित पवारांच्या पक्षाचीही कोंडी झालीय.. अजित पवारांच्या पक्षात छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे आता शिंदे आणि अजित पवार त्यांच्या पक्षातील दिग्गजांचा पत्ता कापणार की आपल्या पक्षातील दिग्गजांचा मान राखणार? याकडे लक्ष लागलंय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.