BJP Leader Sudhakar Khade killed in Sangli  BJP Leader Sudhakar Khade killed in Sangli
महाराष्ट्र

Sangli Crime : भाजप नेत्याच्या हत्येनं खळबळ, सांगलीमध्ये भरदिवसा हत्या

Sangli Crime News : सागंलीमध्ये भरदिवसा भाजप नेत्याची हत्या करण्यात आली आहे. पंढरपूर रोडवर झालेल्या या घटनेनं खळबळ उडाली.

Namdeo Kumbhar

Sangli Crime News : सांगलीमधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. सांगलीमधील भाजप नेते सुधाकर खाडे यांची हत्या करण्यात आली आहे. कुऱ्हाडीने सपासप वार करत खाडे यांच्यावर हल्ला करण्यात आले. सांगलीमधील पंढरपूर रोडवर खाडे यांच्यावर हल्ला कऱण्यात आला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून तपास सुरु करण्यात आल्याचे समजतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, शेत जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने वार करून सुधाकर खाडे यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सांगलीतील पंढरपूर रोडवरील राम मंदिर जवळ ही घटना घडली. खाडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर एकच खळबळ माजली. मंदिराच्या जवळ असलेल्या लोकांची गर्दी झाली. तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. जखमी अवस्थेत खाडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मिरज पोलिसांचे पथक दाखल झाले असून तपास सुरु आहे.

सुधाकर खाडे हे सांगलीमधील भाजपचे नेते आहेत. त्याआधी ते मनसेमध्ये होते. सांगलीचे मनसे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. सुधाकर खाडे हे मनसेच्या स्थापनेपासून जिल्हाध्यक्ष होते. काही दिवसांपूर्वी खाडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. सुधारकर खाडे यांच्या हत्येनं सांगलीमध्ये खळबळ माजली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

SCROLL FOR NEXT