Farmer’s field in Nashik allegedly vandalized after a violent land dispute involving a political leader. saam tv
महाराष्ट्र

भाजप नेत्याची गुंडगिरी; शेतकऱ्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, पिकावरही नांगर फिरवला

BJP Leader Farmer Attack Nashik Land Dispute Case: नाशिकमध्ये जमीन वादातून भाजप नेत्यावर शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला आणि पिकांची नासधूस केल्याचा आरोप. पोलिसांत गुन्हा दाखल असून आरोपींचा शोध सुरू.

Saam Tv

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक: येथील उपनगर परिसरात शेतजमिनीच्या वादातून जीवघेणा हल्ला आणि पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुरेश रंगा बोराडे (५५, रा. पिंपळगाव खांब, ता. जि. नाशिक) यांच्या फिर्यादीवरून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी पांडुरंग चुंभळे (रा. लेखा नगर, इंदिरानगर) आणि त्याच्या ६ ते ७ साथीदारांविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास आरोपी हे बोराडे यांच्या शेतात जबरदस्तीने घुसले. त्यांनी बोराडे यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी तो चुकवला. त्यानंतर आरोपींनी त्यांना शेतातून पळवून लावले. तसेच त्यांच्या पुतण्या योगेश बोराडे यालाही जिवे मारण्याची धमकी देत हुसकावून लावण्यात आले. फिर्यादी विरोध करत नसल्याचे पाहून आरोपींनी शेतातील फ्लॉवर पिकावर नांगर फिरवून मोठे नुकसान केले.

या कृत्यातून शेतजमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. १६ एप्रिल रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस उपनिरीक्षक सपकाळे करत आहेत. आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकारानंतर संशयित आरोपींनी फिर्यादीलाच त्याच्या शेतातून पळवून लावले.

शिवाजी चुंभळे याच्यावर जमिनी बळकावणे, धमकावणे आणि खंडणी मागणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल असून तो एक कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. नाशिक शहरासह पाथर्डी परिसरात त्याने स्वतःची दहशत निर्माण केली असून, बळजबरीने जमिनी हडपण्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चुंभळेवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्याची रवानगी तात्काळ तुरुंगात करावी, अशी आक्रमक मागणी आता स्थानिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

SCROLL FOR NEXT