Ram Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Ram Shinde: शिक्षकांची परिस्थिती बघून नोकरी सोडली अन् राजकारणात आलो, राम शिंदेनी मांडली व्यथा

Maharashtra Politics: राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांचे पगारासाठी आंदोलन सुरू आहे. भाजपचे नेते राम शिंदे यांनी अहिल्यानगर येथे भाषण करताना ते शिक्षक असताना त्यांना आलेला अनुभव सांगितला. त्याचसोबत त्यांनी शिक्षकाची नोकरी का सोडली यामागचे कारण देखील सांगितले.

Priya More

'विनाअनुदानित शिक्षकांची परिस्थिती बघून मी नोकरी सोडली आणि राजकारणात आलो. आता इकडे पगार चालू झाला.', असं मिश्किल भाष्य भाजपचे नेते राम शिंदे यांनी केले आहे. अहिल्यानगरमध्ये क्रीडा शिक्षक अधिवेशनाला राम शिंदे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी विनाअनुदानित शिक्षकांच्या व्यथा मांडल्या. त्याचसोबत त्यांनी 'नाचता येईना अंगण वाकडं.', असं म्हणत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना टोला लगावला.

'विनाअनुदानित शिक्षकांना अगदी थोडा पगार दिला जातो, अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, मी देखील त्याचा लाभार्थी आहे. ही सगळी परिस्थिती बघून मी चार वर्षात नोकरी सोडली आणि राजकारणात आलो. मग इकडे पगार सुरू झाला.' असे मिश्किल भाष्य करत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी विनाअनुदानित शिक्षकांच्या व्यथा मांडल्या. शासनाने योग्य धोरण राबवले पाहिजे अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. शिर्डी येथे आयोजित क्रीडा शिक्षकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलताना शिंदे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत विना अनुदानित शिक्षकांना येणाऱ्या अडचणीबाबत भाष्य केले.

सभागृहातील बेशिस्त आमदारांवर भाष्य करताना राम शिंदे यांनी टीका केली. ते म्हणाले की, 'सभापती असताना देखील तो एका वर्गाचा भाग असतो. शाळेतील विद्यार्थी सराईत नसतात मात्र आमच्या वर्गातले विद्यार्थी खूप सराईत आहेत. त्यामुळे त्यांना कंट्रोल करण्यासाठी वेगेवगेळ्या आयुधांचा अधिकारी माझ्याकडे आहे.स्टेप बाय स्टेप त्यांचा वापर करतो म्हणून सभागृह कंट्रोलमध्ये राहते.'

राम शिंदे यांनी यावेळी रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, 'स्वतःला नाचता आले नाही तर अंगण वाकडं म्हणणं योग्य होणार नाही. आपली माणसं चांगली सांभाळली असती तर अशी परिस्थिती झाली नसती. मी लोकात राहणारा आणि लोकांचं ऐकणारा माणूस आहे. लोक माझ्याकडे आल्यावर मदत करणे हे माझे कर्तव्य आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : पुण्यात API ला २,५०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, असा सापडला जाळ्यात

Smoking health risks: सिगारेट पिणाऱ्यांच्या आजूबाजूलाही फिरकू नका; वाढतो मृत्यूचा धोका

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

SCROLL FOR NEXT