मोबीन खान -
शिर्डी / अहमदनगर: उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेले १५ पैकी अनेक आमदार तसेच १२ हुन अधिक खासदार सुद्धा बाहेर पडतील असा दावा भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केला आहे. तर भरकटलेले जहाज आणि बेताल वक्तव्य करणारे प्रवक्ते एवढीच शिवसेना आता शिल्लक राहिली असल्याचा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊतांच (Sanjay Raut) नाव न घेता लगावला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील ४० आमदार शिंदेच्या गटात सामिल झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत केवळ १५ आमदार असून अनेक खासदार देखील शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आम्हीच खरी शिवसेना (Shivsena) असा दावा दोन्ही बाजूकडून होत असल्याने शिवसेनेत उभी फूट पडल्याचे चित्र आहे.
भाजपने (BJP) चाणाक्ष खेळी करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून ठाकरेंना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंचे टेन्शन आणखी वाढवणारे वक्तव्य केले आहे.
पाहा व्हिडीओ -
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पुढील काही महिन्यातच मध्यावधी निवडणूका लागतील असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी केला आहे. विखे पाटलांनी मात्र हा दावा फेटाळून लावत मध्यावधी निवडणुकीची विधाने नैराश्यातून येत असल्याचे म्हटल आहे.
राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचे बोलले जात आहे. या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी राज्य काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. यावरून विखे पाटलांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
काँग्रेसमध्ये आता कोणावर कारवाई करणार? थोडेफार शिल्लक आहेत ते तरी पक्षात राहिले पाहिजे असा टोला विखे पाटलांनी लगावला आहे. आता विचाराचे आणि विकासाच सरकार स्थापन झाले आहे. हे सरकार अडीच वर्षात जनतेचा विश्वास संपादन करणार आहे. आघाडीने अधोगतीला नेलेल राज्य आता विकासाकडे जाणार यात शंका नाही असा विश्वास आ. राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.