बंडाचे कारण ठरवण्यासाठी कार्यशाळा घ्या; संजय राऊतांनी बंडखोर आमदारांना पुन्हा डिवचलं

बंडखोर आमदारांनी पहिल्या दिवशी आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेतून बाहेर पडल्याचं सांगितलं नंतर राष्ट्रवादी निधी देत नाही, असं सांगितलं.
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSaam TV

रश्मी पुराणिक -

मुंबई : बंडखोर आमदारांनी पहिल्या दिवशी आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेतून बाहेर पडल्याचं सांगितलं नंतर राष्ट्रवादी निधी देत नाही, असं सांगितलं. त्यामुळे बंडखोरांनी बाहेर का पडलो? याचं एक कारण ठरवावं हवतर यासाठी बंडखोर आमदारांनी एक कार्यशाळा घ्यावी असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटातील आमदारांना लगावला आहे. ते आज माध्यामांशी बोलत होते.

यावेळी बोलताना राऊत यांनी त्यांची आणि शरद पवारांची (Sharad Pawar) भेट झाल्याचं सांगितलं, राऊत म्हणाले, 'शरद पवार साहेबांसोबत राजकीय चर्चा झाली, वर्तमान भविष्य आणि भूतकाळ विषयी चर्चा झाली. महाविकास आघाडीतले सगळे नेते आम्ही लवकरच भेटणार आहोत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली अशा चर्चा यापुढे सुद्धा होत राहतील असं राऊत म्हणाले.

तसचं व्हीप बदलणे हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. लोकसभेमध्ये चीफ व्हीपचं महत्त्व खूप असतं असं राऊतांनी सांगितलं. यावेळी त्यांना बंडखोर आमदारांवरती चांगलाच निशाणा साधला. 'बंडखोर आमदारांनी शिवसेनेतून बाहेर का पडलो याबाबत काहीतरी एक कारण ठरवावं. हवंतर त्यांनी यासाठी एखादी कार्यशाळा घ्यावी, असा खोचक टोला त्यांनी शिंदे गटातील आमदारांना लगावला. आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाहेर पडल्याचं त्यांनी आधी सांगितलं नंतर राष्ट्रवादी निधी देत नाही असं सांगितलं त्यामुळे नेमकं एक कारण ठरवा असही राऊत म्हणाले.

राऊत पवारांच्या जवळचे -

दरम्यान, राऊतांच्या या वक्तव्याचा समाचार शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी घेतला. 'आमच्यात आणि उद्धव ठाकरेंमध्ये (Uddhav Thackeray) काय बोलणं व्हायचं हे राऊतांना माहित नाही. शिवाय राऊतांना आपण ठाकरेंच्या खूप जवळचे असल्याचं वाटत पण ते शरद पवारांच्या जवळचे ठाकरेंच्या जवळचे नाहीत असा टोला केसरकरांनी देखील राऊतांना लगावला आहे.

तर यावेशी केसरकरांनी एक मोठं विधानं केलं ते म्हणाले,ही युती लव्ह मॅरेजसारखी आहे असं उद्धव ठाकरेंना वाटतं असेल, शिवाय बंडखोर आमदार परत यावं असं वाटत असेल तर उद्धव ठाकरेंनी आम्हाला बोलवायला हवं आणि त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी चर्चा करावी असं वक्तव्य केसरकर यांनी केल्यामुळे सेना शिंदेगट पुन्हा एकत्र येणार की काय अशा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com