आमदार रोहित पवार 
महाराष्ट्र

रोहित पवारांच्या गळाला भाजपचा मोठा नेता

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर : नगर पंचायतीच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्यात तसतशी राष्ट्रवादी आणि भाजपात रस्सीखेच सुरू आहे. कर्जतची नगर पंचायत भाजपच्या ताब्यात आहे. ती आपल्याकडे खेचून घ्यायचीच, अशी रणनीती सुरू आहे. निवडणुकीआधीच भाजपला सुरूंग लागला आहे. भाजपचे निष्ठावान समजला जाणारा नेता राष्ट्रवादीच्या गळाला लागला आहे. हा राम शिंदे यांच्यासाठी जबर धक्का मानला जातो.BJP leader Prasad Dhokrikar in touch with NCP's Rohit Pawar abn79

गेल्या काही दिवसांपासून कर्जत-जामखेडच्या भाजपात सुंदोपसुंदी सुरू आहे. त्यातून एकेक करीत कार्यकर्ते राजीनामा देऊ लागले आहेत. चार महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर यांनी पक्षाच्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता राम शिंदे आणि भाजपचे निष्ठावान समजले जाणारे प्रसाद ढोकरीकर यांनी राजीनामास्त्र उगारले आहे. त्यांची राष्ट्रवादीची वाढती जवळीक भविष्यात भाजपला डोकेदुखी ठरणार आहे. कारण ढोकरीकर यांचा पक्षप्रवेश केवळ औपचारिकता उरली आहे.

ढोकरीकर यांनी यापूर्वी आमदार रोहित पवार यांना खासगी कार्यक्रमाला बोलावले होते. ते शिंदे समर्थकांना रूचले नव्हते. राम शिंदेही त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यातून त्यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे.BJP leader Prasad Dhokrikar in touch with NCP's Rohit Pawar abn79

कारण घटना तशीच आहे... नगरपंचायतीला अग्निशमन केंद्र मंजूर झाले. मात्र, त्यासाठी जागा मिळत नव्हती. नगरपंचायतीने अनेकांना साकडे घातले, मात्र ते फोल ठरले. आमदार रोहित पवार यांनी जागा देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत उद्योजक प्रसाद ढोकरीकर व त्यांच्या कुटुंबीयांनी चाळीस लाख रुपये मूल्य असलेली सोळा गुंठे जागा अग्निशमन केंद्रासाठी मोफत दिली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व आमदार पवार यांच्या उपस्थितीत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्याकडे या जागेची कागदपत्रे सुपूर्द केली.

आमदार पवार यांच्या माध्यमातून नगरपालिकेस अग्निशमन केंद्र मंजूर झाले. मात्र, अग्निशमन केंद्र व कर्मचारी निवासस्थानासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. नगरपंचायतीने जागा देण्याचे आवाहन केले. मात्र कुणीही पुढे आले नाही. अखेर आमदार पवार यांनी या कामी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक प्रसाद ढोकरीकर व त्यांचे बंधू प्रवीण ढोकरीकर यांनी चाळीस लाख रुपये किंमत असलेले, जोगेश्वरवाडी येथील सोळा गुंठे क्षेत्र नगरपंचायतीला मोफत दिले. पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते मुख्याधिकारी जाधव यांच्याकडे जागेची कागदपत्रे देण्यात आली.

या जागेमुळे अग्निशमन यंत्रणा व कर्मचारी एकाच छताखाली येणार आहे. मोठ्या रकमेची जमीन नगरपंचायतीला मोफत दिल्याबद्दल आमदार पवार, पालकमंत्री मुश्रीफ व राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत शहराध्यक्ष सुनील शेलार यांनी ढोकरीकर बंधूंचे अभिनंदन करून आभार मानले.

Edited By - Ashok Nimbalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ३ दिवसांपासून शिंदे शहांच्या दारात, शिवसेना नावाला कलंक लावला - संजय राऊथ

Government Job: समाज कल्याण आयुक्तालयात नोकरीची संधी; २१९ जागांवर भरती; पात्रता काय? जाणून घ्या

David Warner: डेव्हिड वॉर्नरवरील लाईफटाईम बॅन हटवला! आता कर्णधार होण्यासही सज्ज

NCP Ajit Pawar : अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर; सात नावांचा समावेश

Armaan Malik: युट्युबर अरमान मलिकने केलं चौथं लग्न? करवा चौथच्या त्या व्हिडीओमुळे एकच चर्चा

SCROLL FOR NEXT