Pankaja Munde Saam TV
महाराष्ट्र

Beed :'तुम्ही फक्त साथ,प्रेम आणि आशीर्वाद द्या..पैसे नको; कारखान्यावरील कारवाईनंतर मुंडेंकडून कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

Pankaja Munde News: 'तुम्ही फक्त साथ..प्रेम..आणि आशीर्वाद द्या, असे भावनिक आवाहनही पंकजा मुंडे यांनी केले आहे.

विनोद जिरे

Pankaja Munde News:

'तुम्ही फक्त साथ..प्रेम..आणि आशीर्वाद द्या..पैसे नको..असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यांनी समर्थकांची मदत नाकारली आहे. पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्यावर झालेल्या कारवाई नंतर राज्यभरातून मुंडे समर्थकांनी मदतीचे अभियान सुरु केलं आहे.

आतापर्यंत जवळपास 7 कोटीपेक्षा जास्त रुपयांचे चेक समर्थकांनी जाहीर केले आहेत. मात्र पंकजा मुंडे यांनी आता हा निधी नको, अशी भूमिका घेतली आहे. 'तुम्ही फक्त साथ..प्रेम..आणि आशीर्वाद द्या, असे भावनिक आवाहनही पंकजा मुंडे यांनी केले आहे. (Latest Marathi News)

पंकजा मुंडे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी कार्यकर्त्यांकडून आशीर्वाद मागितले. 'माझ्या अडचणीत आपण सर्व उभे राहिलात यामुळे गहिवरून आले आहे. आपण ज्या पद्धतीने मदत देत आहात, ते खरच आपलं मोठंपण. आपल्या घरातलं किडूक मिडूक विकून आपण जे मदत निधीवर शून्यावर शुन्य लावत आहात, ते माझ्यासाठी डोळे दिपवणारं आहे, अशा मुंडे म्हणाल्या.

'आता तसं करु नका. यातून काय मार्ग काढायचा यासाठी मी वकीलांचे, सीएंचे सल्ले घेत आहे, त्यातून मी योग्य मार्ग काढेल. त्यामुळे मला पैसे देऊ नका, फक्त आशीर्वाद द्या, अशा पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या.

'गोपीनाथ मुंडे साहेबांनी आपल्यात स्वाभिमान पेरला आहे. आपण त्याच स्वाभिमानाने या प्रसंगातून जाऊ. पण मी देणारी आहे. कितीही वाईट वेळ आली तरी आई आपल्या लेकराच्या ताटातलं घेत नाही, अशा पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या.

'कोणी कितीही टीका केली तरी मी तुमच्या आईच्या भूमिकेत आहे. तुम्ही 20 कोटीच काय 40 कोटी सुद्धा जमवाल, पण तुमच्या संसारातलं, तुमच्या लेकरांच्या लग्नासाठी ठेवलेलं असं मला नको. फक्त साथ, प्रेम आणि आशीर्वाद द्या' असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BREAKING: गदारोळानंतर केंद्र सरकारची मोठी कारवाई! शिक्षण विभागातील IAS अधिकाऱ्याची हकालपट्टी, नवीन अधिकाऱ्याचीही नियुक्ती

Maharashtra News Live Update: कॉकरोच जनता पार्टीचा आज पुण्यात मोर्चा

Masala Dosa Recipe: नाश्त्यासाठी घरीच बनवा हॉटेलस्टाईल कुरकुरीत मसाला डोसा, वाचा सोपी रेसिपी

Salt comparison: काळं मीठ आणि सैंधव मीठ यांच्यात काय फरक आहे?

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस, पुण्यासह २० जिल्ह्यांना अलर्ट जारी; वाचा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT