ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामींना भाजपकडून महायुती प्रवेशाची खुली ऑफर.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी करजखेडा कार्यक्रमात वक्तव्य केले.
तेरणा उपसा सिंचन योजनेसाठी ११३ कोटी निधी मंजूर.
धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात नव्या चर्चेला उधाण
BJP offers Mahayuti entry to Uddhav Thackeray MLA Pravin Swami : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदाराला भाजपच्या दिग्गज नेत्याने महायुतीत येण्याची खुली ऑफर दिली आहे. धाराशिवच्या उमरगा लोहारा येथील ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामींना राधाकृष्ण विखे पाटील यांनी महायुतीमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. भरसभेत बोलताना विखेंनी स्वामींना महायुतीत येण्याची ऑफर दिली. दरम्यान, शिवसेनेचे मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी स्वामींची जवळीक चर्चेत आली होती, त्यानंतर आता त्यांना खुली ऑफर आली.
धाराशिवच्या उमरगा-लोहारा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भरसभेत महायुतीत प्रवेशाची खुली ऑफर दिली. लोहारा तालुक्यातील करजखेडा येथे जलसंपदा विभागाच्या कामाच्या उद्घाटनावेळी ही घटना घडली. प्रवीण स्वामी यांनी मतदारसंघातील कामाची मागणी केली असता, “पाणी कुठल्या वळणावर आहे हे तुम्हालाही कळलं पाहिजे…पाणी तर आम्हीच देणार,”असे म्हणत विखे पाटील यांनी उपस्थितांना हात वर करून स्वामींना निर्णय घेण्याचे आवाहन केले. या वक्तव्यामुळे जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, यापूर्वी शिवसेनेचे मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री असलेल्या प्रताप सरनाईक यांनी थेट स्वामींच्या घरी जात सत्कार स्वीकारला होता. यावेळीही जवळीक चर्चेत आली होती. माञ मी शिवसैनिक म्हणून निवडून लढवलो आणि शिवसैनिकच राहणार असं स्पष्टीकरण आमदार प्रविण स्वामी यांनी दिलं.
तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्ती कामाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भुमीपुजन
निम्म तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्ती कामाचे करजखेडा येथे राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भुमीपुजन करणार आले. देवेंद्र फडणवीस सरकारने या दुरुस्तीच्या कामासाठी ११३ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. दरम्यान धाराशिव, लोहारा व औसा तालुक्यातील 23 गावातील क्षेत्र ओलिताखाली येणार आहेत. निम्म तेरणा उपसा सिंचन योजना लवकरच कार्यान्वित होणार असून पुढच्या ऑगस्टपर्यंत ही योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती राधाकृष्ण विखे यांनी दिली. यावेळी मिञचे उपाध्यक्ष आ.राणा जगजितसिंह पाटील आ.प्रविण स्वामी यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी व करजखेडा येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.