Nitesh Rane  Saam Tv
महाराष्ट्र

Nitesh Rane On Ajit Pawar: 'गुगलवर धरणवीर सर्च केले तरी...' नितेश राणेंनी अजित पवारांना पुन्हा डिवचले

अजित पवारांनी टिल्लू म्हणत खिल्ली उडवल्यानंतर नितेश राणेंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Gangappa Pujari

Nitesh Rane: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत छत्रपती संभाजी राजेंचा धर्मवीर असा उल्लेख करु नका असे विधान केल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. काल पत्रकार परिषद घेत अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबद्दलची आपली भूमिकाही स्पष्ट केली, ज्यामध्ये त्यांनी नितेश राणेंची टिल्लू म्हणत खिल्ली उडवली होती. या नंतर नितेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

अजित पवार यांच्या टीकेला उत्तर देताना नितेश राणे (Nitesh Rane) यांनी "याच टिल्लूने तुम्हाला सिंधुदुर्ग बॅंक निवडणुकीत कसा घाम फोडला होता," हे सर्वांनी पाहिले आहे. असे म्हणत जोरदार टीका केली आहे. तसेच  छत्रपती धर्मवीर संभाजी राजेंना हिंदू धर्मापासून वेगळं करायचं आहे. कारण हे औरंगजेब बरोबर वेलेन्टाइन डे साजरा करणारे लोकं आहेत, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला आहे.

अजित पवारांवर टीका करताना "गुगलला धरणवीर नाव सर्च केले तरी एकच नाव येणार अजित पवार. यांच्याच महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रतापगड,विशाळगडवर अनधिकृत बांधकाम झालं ते तोडण्याची हिंमत झाली नाही," असे म्हणत शरद पवारांवरही नितेश राणेंनी टीका केली आहे.

दरम्यान, खालच्या पातळीवरची टीका मी सुद्धा करु शकतो परंतु ते आमचे संस्कार नाहीत असे म्हणत, शरद पवार यांनी देखील संभाजी महाराजचं धर्मवीर असल्याचे बोलले आहेत, आम्ही त्यांचेच ऐकणार असेही यावेळी नितेश राणे म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

SCROLL FOR NEXT