PRABODH DAVKHARE JOINS NCP SPARKS POLITICAL BUZZ IN THANE Saam Tv
महाराष्ट्र

Political News : भाजप नेते निरंजन डावखरेंच्या भावाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, ठाण्याच्या राजकारणात खळबळ

Thane Niranjan Davkhare Brother Prabodh Davkhare Joins NCP : दिवंगत नेते वसंत डावखरे यांचे चिरंजीव आणि निरंजन डावखरे यांचे बंधू प्रमोद डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Alisha Khedekar

  • प्रबोध डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला

  • वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत सोहळा पार पडला

  • ठाणे जिल्ह्यातील राजकारणात बदलाची चिन्हे

  • डावखरे कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे

Thane Niranjan Davkhare Brother Prabodh Davkhare Joins Ajit Pawar NCP राजकीय क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. दिवंगत नेते वसंत डावखरे यांचे चिरंजीव आणि निरंजन डावखरे यांचे बंधू प्रमोद डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मंत्री छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची विशेष उपस्थिती होती. भाजप नेते निरंजन डावखरे यांचे मोठे बंधू प्रबोध डावखरे यांच्या पक्षप्रवेशाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणले.

पक्षप्रवेशावेळी छगन भुजबळ यांनी प्रबोध डावखरे यांचे स्वागत करताना त्यांच्या वडिलांचा उल्लेख केला. “वसंत डावखरे हे आजातशत्रू होते. त्यांच्या कार्यशैलीत कुठेही कटुता नव्हती. त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी प्रबोध डावखरे राष्ट्रवादीत आले आहेत, ही आनंदाची बाब आहे,” असे भुजबळ म्हणाले. तसेच पक्षात सर्वांना समान वागणूक दिली जाते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनीही प्रबोध डावखरे यांच्या प्रवेशाचे स्वागत करत विश्वास व्यक्त केला. “प्रबोध डावखरे हे यशस्वी व्यावसायिक असून राज्यभरात त्यांनी ३० जिम्स उभारल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात त्यांचा मोठा संपर्क आहे. पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतील,” असे वळसे पाटील म्हणाले.

प्रबोध डावखरे यांच्या वडिलांनी राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या परंपरेचा वारसा पुढे नेत प्रबोध डावखरे आता सक्रिय राजकारणात उतरले आहेत. दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे ठाणे आणि परिसरातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राष्ट्रवादीसाठी किती फायदेशीर ठरेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : विदर्भात तापमानाचा पारा 46 पार...

भक्ती-संस्कृतीचा अनोखा संगम; दुर्गा काली माता देवीला ६० डझन आंब्यांचे आरास

पार्लरमध्ये जायची गरज नाही, घरच्या घरी मिळवा काचेसारखी चमकदार त्वचा! दररोज फॉलो करा 'ग्लास स्किन' केअर रुटीन

Meta Layoff: आधी WFH, नंतर सकाळी ४ वाजताच कर्मचाऱ्यांना मेल; मेटा ८००० कर्मचाऱ्यांना काढून टाकणार, टेक क्षेत्रात खळबळ

WTC Point Table : डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये मोठा उलटफेर; बांगलादेश-पाकिस्तान कसोटीमुळं टीम इंडियाला जोरदार झटका

SCROLL FOR NEXT