Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray,  saam tv
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule News: 'पुढच्या आठ महिन्यात...' चंद्रशेखर बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंबद्दल मोठे विधान; चर्चांना उधाण

ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यांच्या मुलाला मंत्री करायचे होते. म्हणूनच ते राष्ट्रवादी, कॉंग्रेससोबत गेले, असा आरोपही बावनकुळेंनी यावेळी केला.

Prachee kulkarni

Maharashtra Politics: शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. निवडणूकीविरोधात एकीकडे ठाकरे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली असतानाच हे सगळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांमुळेच झाले, असा सुर शिंदे गट आणि भाजपाने लावला आहे.

या सगळ्या प्रकरणावर आता भाजपाप्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे विधान केले आहे. साम टीव्हीवर झालेल्या मुलाखतीत ते बोलत होते. (ChandraShekhar Bawankule EXclusive)

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज साम टिव्हीला एक्सक्लूझिव मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी, पुणे पोटनिवडणूक, पहाटेचा शपथविधी, तसेच शिंदे ठाकरेंच्या सत्तासंघर्षावरही प्रतिक्रिया दिल्या, ज्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे...

"शिवसेनेमध्ये झालेली बंडखोरी ही उद्धव ठाकरेंमुळेच (Udhav Thackeray) झाली असे म्हणत त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यांच्या मुलाला मंत्री करायचे होते. म्हणूनच ते राष्ट्रवादी, कॉंग्रेससोबत गेले. तिकडे जाऊनही त्यांनी त्यांच्या आमदारांना, मंत्र्यांना वेळ दिला नाही," असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. दरम्यान यावेळी पुणे पोट निवडणूकीत भाजपाचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तसेच, "ठाकरे गटाच्या भवितव्याबद्दल बोलताना त्यांनी पुढच्या आठ महिन्यात त्यांच्याकडे फक्त चारच लोक राहतील," असेही विधान केले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं महागलं; ऐन लग्नसराईत २२ अन् २४ कॅरेटचे दर किती?

Maharashtra News Live Update : वसंत मोरे यांच्यावर उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी

Bachchu Kadu : मोठी बातमी! बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; अधिकृत घोषणा

Pune Train : पुण्याहून नागपूरला जायचं टेन्शन संपलं, समर स्पेशल ट्रेन झाली सुरू; वाचा कुठे थांबणार?

Ready To Wear Blouse : प्रत्येक साडीसाठी नवीन ब्लाउज कशाला? 'या' ५ रंगांचे रेडी-टू-वेअर ब्लाउज खरेदी करा, शिलाईचे पैसे वाचतील

SCROLL FOR NEXT