BJP LEADER ARRESTED IN SHALARTH ID SCAM | ₹160 CRORE EDUCATION FRAUD EXPOSED saam tv
महाराष्ट्र

शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी भाजपच्या बड्या नेत्याला अटक, शिक्षणक्षेत्रासह राजकीय वर्तुळात खळबळ

BJP leader Sanjay Garud arrested in Shalarth ID scam Maharashtra: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजपच्या बड्या नेत्याला अटक; 160 कोटींच्या शिक्षण घोटाळ्याचा तपास वेगात. नाशिक एसआयटीची मोठी कारवाई, जळगावमधील बनावट शिक्षक प्रकरण उघड.

Omkar Sonawane

संजय महाजन, साम टीव्ही

शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी नाशिक SIT ने सोमवारी (दि.27) रात्री मोठी कारवाई केली असून यामध्ये भाजपच्या नेत्याला अटक केली आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील संजय गरुड या बड्या शिक्षण संस्थाचालकास एसआयटीने सातारा जिल्ह्यातील फलटण येथून ताब्यात घेतले आहे. संजय गरुड यांचा 30 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला होता. या प्रकरणी एक बडा मासा गळाला लागल्याने घोटाळ्याचे अनेक धागेदोरे उलगडणार आहे.

एसआयटीचे पथक आज मंगळवारी सकाळी या शिक्षण संस्था चालक संजय गरुड याला घेऊन नाशिकमध्ये पोहोचणार असून त्याला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर याला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती एसआयटीतील सूत्रांनी दिली आहे. हिंगोणीकर याने पदाचा गैरवापर करत 259 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमबाह्य मान्यता दिली होती. यामधील बहुतांश शिक्षक हे अटक करण्यात आलेल्या या जामनेर तालुक्यातील बड्या शिक्षण संस्था चालकाच्या शाळेतील आहेत, असे देखील सूत्रांनी सांगितले. त्या आधारे त्याच्या फलटणमधून मुसक्या आवळण्यात आल्या.

सर्वाधिक आरोपी हे जळगाव जिल्ह्यातील असून बनावट शालार्थ आयडी तयार करून तब्बल 160 कोटींची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. या फसवणुकीच्या रॅकेटमधील हा संजय गरुड हा एक महत्वाचा आरोपी आहे. तपासादरम्यान या गुन्ह्यातील एकूण 481 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी 438 जण जळगाव जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. त्या अनुषंगाने संबंधित शिक्षण संस्था चालकास अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : मुलीच्या पोटात दुखू लागल्याने उघडकीस आला भयंकर प्रकार! ६० वर्षांच्या नराधमाचे सख्ख्या बहिणींवर अत्याचार

Satara Waterfalls : पावसाळ्यात धबधब्यांनी खुलतंय 'हे' सुंदर ठिकाण, निसर्गप्रेमींनी नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट आज दुपारी १२ ते २ पर्यंत बंद

Mysterious temples: भारतातील सर्वात रहस्यमय मंदिरं; शतकानुशतकं न उलगडलेली गूढ रहस्यं

इकडे कच्चे तेल धडाम, तिकडे पेट्रोल डिझेलचे आजचे दर जाहीर; जाणून घ्या ग्राहकांना दिलासा मिळाला का?

SCROLL FOR NEXT