Nana Patole
Nana Patole Saam TV
महाराष्ट्र

भाजपने 5 महिने ST आंदोलन पेटवत ठेवले; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : गेल्या पाच महिन्यात राज्यातील जनतेचं, एसटी कामगारांचं मोठं नुकसान झालं आहे. भाजपने (BJP) पाच महिने एसटीचं आंदोलन तेवत ठेवलं आणि जनतेला त्रास दिल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

केंद्रातील भाजपचं सरकार गेल्या आठ वर्षांत अपयशी ठरलं आहे. केंद्रातील आपली खुर्ची वाचवण्यासाठी साम्रदायीक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नही भाजप करत असल्याचं पटोले म्हणाले. राज्यातील मुस्लीम समाजाने ७२ टक्के भोंग्याचे आवाज कमी केलेय, काहींनी भोंगे काढले आहेत. राज्यातील भाईचारा संपू नये यासाठी मुस्लीम समाजाचा पुढाकार घेत असेल तर हे गौरवास्पद असल्याचंही ते म्हमाले.

वकील गुणरत्न सदावर्तेंकडे (Gunaratna Sadavarte) नोटा मोजण्याची मशीन सापडली आहे. गेल्या पाच महिन्यात राज्यातील जनतेचं, एसटी कामगारांचं () मोठं नुकसान झालं. भाजपने पाच महिने एसटीचं आंदोलन (ST Strike) तेवत ठेवलं आणि जनतेला त्रास दिल्याचा गंभीर आरोपही नाना पटोलेंनी भाजपवर केला. शिवाय एसटी कामगारांच्या मागण्या योग्य सरकाने त्यांना न्याय द्यावा अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली.

निवडणूका आहेत, त्यांच्या तयारी सर्व पक्ष करत आहेत. त्यामुळे कोण कोणाची पोलखोल करतात काय करतात, आखीर जनता समजदार, मतदानाच्या माध्यमातून जनता भाजपची पोलखोल करेल असंही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM बिघाड, राडा, तुंबळ हाणामारी, व्हिडिओ आणि आरोपांच्या फैरी; तिसऱ्या टप्प्यात कुठं काय घडलं?

IPL 2024 DC vs RR : एकाच षटकात २ विकेट घेत कुलदीपने पालटली बाजू; घरच्या मैदानावर दिल्लीने राजस्थानचा २० धावांनी केला पराभव

Bhayandar News : सोसायटीचं फायर टेंडर दिलं नाही म्हणून अग्निशमनच्या अधिकाऱ्यांने केली बेदम मारहाण, खजिनदार गंभीर जखमी

Maharashtra Politics: निवडणूक रोखे योजनेत मोठा भ्रष्टाचार, भाजपकडून त्याच पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर: पृथ्वीराज चव्हाण

BSP National Coordinator : मायावतींनी आकाश आनंद यांना नॅशनल कॉर्डिनेटरपदावरून हटवलं, आता जबाबदारी कोणावर?

SCROLL FOR NEXT