Bjp Georai Mla Laxman Madhavrao Pawar Resigns for Maratha Reservation Demand Saam Tv
महाराष्ट्र

BJP MLA Resign: मुख्यमंत्री शिंदेंनंतर फडणवीसांनाही धक्का! मराठा आरक्षणासाठी भाजप आमदाराने दिला राजीनामा

BJP MLA Laxman Madhavrao Pawar: मुख्यमंत्री शिंदेंनंतर फडणवीसांनाही धक्का! मराठा आरक्षणासाठी भाजप आमदाराने दिला राजीनामा

Satish Kengar

BJP Georai Mla Laxman Madhavrao Pawar Resigns for Maratha Reservation Demand:

राज्यात मराठा आरक्षण आंदोलन अधिक तीव्र झालं आहे. राज्यभरात मराठा आंदोलकांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. यातच आता अनेक पक्षातील कार्यकर्ते आणि नेते यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते हेमंत पाटील यांनी पत्र लिहीत आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिलं आहे की, ''महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून या मराठा आरक्षणासाठी माझा पाठींबा असून मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याआधी शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिलं होतं की, ''महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशयतिव्र असून, मी अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी, शेतकन्यांसाठी भांडणारा कार्यकर्ता आहे. आरक्षणाच्या आंदोलनासाठी माझा पाठींबा असून, आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.'' (Latest Marathi News)

दरम्यान, खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयाकडे खासदारकीचा राजीनामा दिला आहे. ते उद्या लोकसभा आद्यक्शनची भेट घेणार आहेत. लोकसभा अध्यक्ष कार्यालयाने त्यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचं सांगण्यात येत आहे.

याचबद्दल बोलताना ते म्हणाले आहेत की, ''मी ओम बिर्ला यांच्या कार्यालयाकडे राजीनामा दिला आहे. राज्यात मराठा समाजाचा मुद्दा पेटलेला असताना मला पदावर रहायचा अधिकार नाही. जरांगे पाटील यांची तब्बेत खालावत आहे. पण ते मागणीवर ठाम आहेत. मुख्यमंत्री यांनी उद्या बैठक बोलवली आहे. त्यांचाही प्रयत्न आहे आरक्षण द्यावं. त्यांनी तर शिवाजी महाराज यांची शपथ घेतली आहे. माझा निर्णय भावनिक नाही. मी विचारपूर्वक राजीनामा दिला आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT