Bhandara political upset local elections Saam
महाराष्ट्र

भाजपकडून शिंदे अन् अजित पवार गटाला धक्का, मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत बड्या नेत्यांची एन्ट्री

Bhandara political upset local elections: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यात राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. भाजपनं शिंदे गट आणि अजित पवार गटाला धक्का दिला आहे.

Bhagyashree Kamble

  • भंडाऱ्यात राजकीय घडामोडींना वेग.

  • भाजपकडून शिंदे अन् अजित पवार गटाला धक्का.

  • भाजपची ताकद वाढली.

पुढील काही महिन्यांत अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील. आगामी निवडणुकांमुळे प्रत्येक जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. कुठे इनकमिंग तर, कुठे बड्या नेत्याची आऊटगोइंग सुरू आहे. तर काही नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यात भाजपने शिवसेना शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.

भंडाऱ्यात महायुतीतच फूट पडली असल्याचं चित्र आहे. भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का दिला आहे. शिवसेना शिंदेंच्या युवा शिवसेनेचे भंडारा-गोंदिया लोकसभा प्रमुख जॅकी रावलानी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच माजी नगराध्यक्ष भगवान बावनकर या दोघांनी आपआपल्या पक्षाला रामराम केला आहे. त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

हा पक्षप्रवेश सोहळा नागपुरात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात दोघांनीही पक्षप्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जबरदस्त धक्का बसला आहे.

आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे खंदे समर्थक म्हणून जॅकी रावलानी यांची ओळख होती. आमदार भोंडेकर यांच्या विजयात रावलानी यांचा सिंहाचा वाटा होता. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रावलानी यांनी शिंदे गटाची साथ सोडल्यामुळे भोंडेकर यांना जबर धक्का मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रथोत्सवाला आई-वडिलांना घेऊन गावी आला; घरामागे उभा असताना बंदुकीच्या गोळीनं घेतला वेध, थेट छातीत घुसली!

Kurkuri Bhendi: मुलांच्या डब्ब्यासाठी झटपट बनवा कुरकुरी भेंडी, सिंपल रेसिपी करा फॉलो

Mumbai Tourism : मुंबईत विरंगुळ्याचे बेस्ट ठिकाण, ऑफिसमधून थकून आल्यावर 'येथे' नक्की जा

Oxidized Jewellery Cleaning: ऑक्सिडाइज्ड दागिने काळे पडतायेत? स्वच्छ करण्यासाठी वापरा 'या' टिप्स

Gajar Halwa Recipe: गोड खाण्याची इच्छा झाली आहे; मग घरी झटपट बनवा हॉटेल स्टाईल गाजर हलवा

SCROLL FOR NEXT