देगलूर बाजार समितीवर भाजपचा झेंडा; अशोक चव्हाणांना धक्का!  saamtv
महाराष्ट्र

देगलूर बाजार समितीवर भाजपचा झेंडा; अशोक चव्हाणांना धक्का!

18 पैकी 18 जागेवर भाजपचे उमेदवार विजयी

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातील देगलूर (Deglur) कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप प्रणित पॅनलने एकहाती सत्ता मिळवली आहे. प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी च्या पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडवलाय. भाजप प्रणित पॅनलचे सर्वच 18 उमेदवारां पैकी 18 उमेदवार विजयी झाले.

हे देखील पहा :

आज झालेल्या मतमोजणी दरम्यान, हा निकाल हाती आला आहे. बाजार समितीची (APMC) स्थापना झाल्यापासून 60 वर्षात पहिल्यांदाच बाजार समितीवर भाजपचा (BJP) झेंडा फडकलाय. भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दोन महिन्यापूर्वी झालेल्या देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत मोठी ताकत लावून ही त्यांना भाजपचा उमेदवार निवडून आणता आला नाही.

मात्र, देगलूर बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकवून तालुक्यात भाजप मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. देगलूर बाजार समितीवरील भाजपच्या विजयामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना धक्का बसला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT