2024 च्या लोकसभेतील पराभव जिव्हारी लागल्यानं भाजपनं ४ वर्ष आधीच 2029 च्या निवडणुकीची तयारी सुरु केलीय.. त्यासाठी भाजपनं ऑपरेशन लोटसद्वारे काँग्रेसला धक्का देत पुन्हा एकदा पवारांना घेरण्याची रणनीती आखलीय...
भोरच्या संग्राम थोपटेंनंतर काँग्रेसच्या संजय जगतापांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत भाजप प्रवेश निश्चित केलाय... 17 जुलैला संजय जगताप हाती कमळ घेणार असल्याची माहिती समोर आलीय..
भाजपने आधीपासूनच शरद पवारांचा बालेकिल्ला भेदण्यासाठी जोर लावला होता. खुद्द सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभं करुनही बारामती जिंकता आली नाही... तर सुप्रिया सुळेंनी महायुतीविरोधात तब्बल 1 लाख 58 हजार मतांनी आघाडी घेत विजय मिळवला... त्यावेळी सुप्रिया सुळेंना कोणत्या मतदार संघात आघाडी होती पाहूयात..
अजित पवारांच्या बारामती सुळेंना 47 हजार मतांची आघाडी
इंदापूरमध्ये सुळेंना 25 हजार मतांचं लीड
दौंड मतदारसंघात 26 हजार मतांची आघाडी
पुरंदरमध्ये सुप्रिया सुळेंना 35 हजार मतांची आघाडी
भोर मतदारसंघातून सुळेंना तब्बल 43 हजार मतांचं लीड
खडकवासला वगळता इतर सर्वच मतदारसंघात सुप्रिया सुळेंना लीड मिळालं... मात्र आता भाजपने 2029 ची तयारी करताना शरद पवारांच्या गडाला सुरुंग लावत अजित पवारांनाही धक्का दिलाय..
सुळेंना मोठं लीड देणाऱ्या थोपटेंचा भाजपात प्रवेश
पुरंदर हवेलीचे संजय जगताप भाजपच्या गळाला
दत्ता भरणेंना शह देण्यासाठी प्रवीण मानेंचा भाजपात प्रवेश
खडकवासला आणि दौंडमध्ये भाजपचे आमदार आहेत... तर भाजपने भोर वेल्हा आणि पुरंदर हवेली मतदारसंघातही पवारांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याची रणनीती आखलीय. त्यामुळे थोपटे, माने आणि जगतापांच्या भाजप प्रवेशाने बारामती मतदारसंघात पवारांचा ताप वाढणार हे मात्र निश्चित.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.