वर्ध्यात भाजपला 'पंजा' दाखवत जिल्हाध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश  Saam TV
महाराष्ट्र

वर्ध्यात भाजपला 'पंजा' दाखवत जिल्हाध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

वर्धा जिल्ह्यात भाजपला जबर धक्का, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे.

सुरेंद्र रामटेके

वर्धा जिल्ह्यात भाजपला जबर धक्का, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे. भाजपमध्ये बरेच दिवसापासून नाराज असल्याच्या चर्चा होत्या. सेवाग्राम सर्कल मधील करंजी येथे प्रभत फेरीनंतर डॉ. शिरीष गोडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, यावेळी काँग्रेसचे महासचिव केसी वेणूगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री सुनील केदार, आमदार रणजित कांबळे यांच्या उपस्थितीत होती.

काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राजीनामा पाठवला होता. डॉ. गोडे यांचे मन वळवण्यात भाजप नेत्यांना अपयश आल्याते दिसत आहे. डॉक्टर गोडे विद्यमान भाजप जिल्हाध्यक्ष असून यापूर्वी ते दोनवेळा भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. भाजपचं संघटन वाढवण्यात डॉ गोडे यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. आमदार रणजित कांबळे यांच्या प्रयत्नाने, आमदार सुनील केदार यांच्या नेतृत्वात डॉ. शिरीष गोडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO कर्मचाऱ्यांना लवकरच गुड न्यूज! बेसिक सॅलरी १५००० रुपयांवरुन ₹२५००० होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Lucky zodiac signs: कार्तिक कृष्ण षष्ठीत चार राशींना लाभ; आत्मविश्वास आणि आर्थिक सुधारणा दिसणार

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र गारठला, मुंबई, पुण्यासह राज्याचा पारा घसरला

Crime : धक्कादायक! काँग्रेस नेत्याने पत्नीला जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न, महाराष्ट्र हादरला

Mumbai Rent Rules: मुंबईकरांच्या कामाची बातमी! घर भाड्याने देण्यापूर्वी हे काम कराच अन्यथा ₹५००० दंड भरा

SCROLL FOR NEXT