BJP Council of Ministers saam tv
महाराष्ट्र

BJP Council of Ministers: आगामी लोकसभा सोडाच, भाजपच्या मंत्री परिषदेत ठरला 2047 पर्यंतचा मेगा प्लान?

BJP Mega Plan : मंत्रिपरिषदेच्या बैठकीत भाजपचा लोकसभा निवडणुकीसाठी मेगा प्लान ठरल्याची माहिती समोर येत आहे.

Chandrakant Jagtap

>> प्रमोद जगताप, साम टीव्ही

Modi Cabinet Reshuffle: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नुकतीच भाजपच्या मंत्री परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचा लोकसभा निवडणुकीसाठी मेगा प्लान ठरल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या बैठकीला उपस्थित होते अशी माहिती आहे.

भाजपच्या या मंत्री परिषदेच्या बैठकीतून भाजपने विरोधकांना शह देण्यासाठी मेगा प्लान आखला आहे. आगामी 2024 च्या निवडणुकीबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. मंत्रिपरिषदेची ही बैठक तब्बल पाच तास सुरू होती. (Breaking News)

या बैठकीतून आगामी मंत्रिमंडळ विस्तार आणि पक्ष संघटनेतील बदलाबाबत पंतप्रधान मोदी यांनी संकेत दिले अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळतेय. "तुमच्या अनुभवाचा फायदा नव्या नेतृत्वाला व्हायला हवा" असा सल्ला मोदींनी या बैठकीत नेत्यांना दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Political News)

विशेष म्हणजे या मंत्री परिषदेच्या बैठकीत फक्त आगामी निवडणुकीबाबतच नाही तर 2047 पर्यंतच्या नियोजनाची चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. 2047 साली भारताला स्वातंत्र्य मिळून 100 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे तोपर्यंत देशाची स्थिती काय असेल याबाबत मोदींनी या बैठकीत मार्गदर्शन केल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Ladki Bahin Yojana : महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने पुन्हा घेतला मोठा निर्णय

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT