BJP Corporator Booked 
महाराष्ट्र

राज्यात खळबळ! भाजप नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा, घरात घुसून महिलेला धमकी दिली अन्...

Suraj Pandey, BJP corporator, Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगरपरिषदेचे भाजप नगरसेवक सूरज पांडे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगरपरिषदेचे भाजप नगरसेवक सूरज पांडे यांच्याविरुद्ध विनयभंग, घरात घुसून धमकी देणे आणि अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधीनेच महिलेसोबत असे कृत्य केल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नेमकी घटना काय?

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ६ जुलैच्या रात्री आरोपी नगरसेवक सूरज पांडे हा तिच्या घरात बेकायदेशीरपणे घुसला. घरात प्रवेश केल्यानंतर त्याने महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्याने महिलेचा विनयभंग केला. या घटनेचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता सूरज पांडे याने महिलेला थेट जीवे मारण्याची धमकी दिली.

नवीन कायद्यानुसार गुन्ह्यांची नोंद

पीडित महिलेने तातडीने गडचांदूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन याप्रकरणी फिर्याद दिली. महिलेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी भाजप नगरसेवक सूरज पांडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 79, 329(3) आणि 351(2) अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांचा तपास

एका लोकप्रतिनिधीवर थेट विनयभंग आणि घरात घुसून धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गडचांदूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास अत्यंत वेगाने सुरू केला आहे. आरोपी नगरसेवकाला अद्याप अटक झाली नाही, याबाबत पोलीस अधिक माहिती घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT