Chandrakant Patil On Vinayak Mete Saam TV
महाराष्ट्र

विनायक मेटेंसोबत घातपात झाला असेल तर..., चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी देखील काहीतरी वाईट घडल्याचा संशय व्यक्त केला आहे.

संभाजी थोरात

कोल्हापूर : शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं कार अपघातात निधन झालं. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या कारला भीषण अपघात (Accident) झाला. अपघातात मेटे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. (Chandrakant Patil Todays News)

दरम्यान, मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर आता शिवसंग्रामच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी देखील काहीतरी वाईट घडल्याचा संशय व्यक्त केला आहे. यावर भाजप नेते आणि महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

चंद्रकांत पाटील हे आज कोल्हापुरात आले. त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. विनायक मेटे यांचा घातपात झाला असल्याच्या संशयाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारलं असता, 'विनायक मेटे यांच्यासोबत घातपात झाला असेल, तर त्याच्या मुळापर्यंत मुख्यमंत्री जातील. घटनेची सविस्तर चौकशी होईल', असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. (Vinayak Mete Latest News)

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल. आताच मला असंही कळालं आहे की, या अपघाताला जबाबदार असलेला ट्रक हा गुजरातमधील सुरत येथे सापडला आहे. आता ट्रक सापडला, त्यामुळे चालकही सापडेल. मग या घटनेची चौकशीही होईल. याक्षणी संबंधित घटनेबाबत मी मत व्यक्त करणं बरोबर नाही. पण हा जर घातपात असेल तर मुख्यमंत्री त्याच्या मुळापर्यंत जातील' असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: लिफ्टमध्ये अडकली होती २ मुलं, धाडस दाखवत मुलीने वाचवले प्राण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी मोठी अपडेट

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

SCROLL FOR NEXT