देशमुखांच झालं तसं गवळीचं होणार, चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला इशारा Saam Tv
महाराष्ट्र

देशमुखांच झालं तसं गवळीचं होणार, चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला इशारा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी भावना गवळीवर टीका केली

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : अनिल देशमुखांच्या बाबतीत जसे झाले आहे तसेच भावना गवळीचं होईल, शेवटी त्यांच्या नेत्यांनी ही हातं वर केलं आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी भावना गवळीवर टीका केली आहे. भावना गवळी किती काळ पळापळ करणार असे देखील वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

हे देखील पहा-

तिघे नव्हे तर ५ जणही एकत्र येऊन आमच्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही पुरून उरू, असा स्पष्ट इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. तिघाडीचे हे सरकार लवकरच, पण मुहूर्त सांगणार नाही, त्यांच्या कर्माने ते लवकरच कोसळणार आहेत, असे भाकीत त्यांनी यावेळी केले आहे. शिवसेनेचे माजी आमदार सुभाष पिराजी साबणे यांना भाजपने विधानसभेच्या देगलूर पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी कालच जाहीर करण्यात आली आहे.

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत तर लांबच मात्र, उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची साधी विचारपूस देखील केली नाही अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केली आहे. पंचनामे करायला शेतात उरलयं तरी काय माती सुध्दा वाहून गेली आहे. २०१९ च्या जीआर प्रमाणे शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी चंद्रकात पाटील यांनी यावेळी केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Shocking: पंढरपुरात वारीला जाऊन आला अन् घरात येऊन आयुष्य संपवलं; खिशात सापडली 'ही' गोष्ट

Tandoor Roti Recipe: ढाबा स्टाइल परफेक्ट तंदूर रोटी, घरीच १० मिनिटांत बनवा

kalyan : मराठी-हिंदी वाद सुरू असतानाच शिवसेनेत शेकडो उत्तर भारतीयांचा प्रवेश

Haunted Island: जगातील सर्वात भयानक झपाटलेले बेट, आवाज, आत्म्यांचा त्रास! वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT