Chandrakant Raghuvanshi statement on Eknath Shinde and BJP Saam TV (AI)
महाराष्ट्र

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंमुळे भाजप जिवंत, नाहीतर अस्तित्वच राहिलं नव्हतं; शिंदे गटाच्या आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

Chandrakant Raghuvanshi statement on Eknath Shinde and BJP : एकनाथ शिंदेंमुळेच भाजपला महाराष्ट्रात सत्तेत येण्याची संधी मिळाली, अन्यथा भाजपचे अस्तित्व राहिले नसते, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.

Namdeo Kumbhar

Eknath Shinde, Chandrakant Raghuvanshi : महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिंदे गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याने युतीमधील मित्रपक्ष भाजपलाच थेट डिवचले आहे. "एकनाथ शिंदेंमुळेच भाजप जिवंत आहे, अन्यथा पक्षाचे अस्तित्व उरले नव्हते," असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना (शिंदे गट) नेते व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे. रघुवंशी यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात गदारोळ माजला असून चर्चेला उधाण आले आहे.

नंदुरबार येथे पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, महायुती सरकार हे तीन पक्षांचे मिळून बनलेले सरकार आहे आणि तिन्ही पक्ष या सरकारमध्ये दावेदार आहेत. पण भाजपला एकनाथ शिंदे यांनीच संजीवनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या काळात भाजप कुठे सत्तेत होती? एकनाथ शिंदे यांनी उठाव केला म्हणूनच भाजप आज राज्यात सत्तेत आली आहे.

सर्वांनी मिळून केलेलं काम आहे, कारण सरकार तीन पक्षांचं आहे, तीन पक्ष दावेदारच आहेत. उलट मी जर बोललो तर राग येईल.भारतीय जनता पक्षाला जिवंत एकनाथ शिंदेंनी करून दिलंय, नाहीतर भारतीय जनता पक्षाचं अस्तित्वच राहिलं नव्हतं. महाविकास आघाडीच्या वेळेला भारतीय जनता पक्ष कुठे सत्तेत होता? एकनाथ शिंदेंनी उठाव केल्यावरच भारतीय जनता पक्ष सत्तेत आला आणि गावीत साहेबांची लॉटरी लागली. अडीच वर्ष गावीत साहेब आदिवासी मंत्री राहिले.
चंद्रकांत रघुवंशी, विधान परिषद आमदार , शिवसेना शिंदे गट

चंद्रकांत रघुवंशी यांनी यावेळी भाजप नेते व माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, एकनाथ शिंदेंच्या उठावामुळेच डॉ. विजयकुमार गावित यांची लॉटरी लागली आणि ते अडीच वर्ष आदिवासी विकास मंत्री राहिले. नंदुरबार जिल्ह्यातील महायुतीमधील वाद जुनाच असून, रघुवंशी यांच्या या ताज्या वक्तव्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील दरी आणखी रुंदावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

'टेस्ला'च्या फ्लाईँग कारवर मीम्स व्हायरल, मस्क यांच्या निर्मितीला भारतीयांची मिश्किल दाद

Punjab Accident: भरधाव कारनं मनरेगा मजुरांना चिरडलं; 8 जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT