Nagpur News Saam Tv
महाराष्ट्र

नागपुरात पाणी प्रश्नावरून भाजप आक्रमक; आयुक्तांवर फोडलं पाणी टंचाईचं खापर

आयुक्तांचा कारभार राज्य सरकारच्या इशाऱ्यावर; भाजप नगरसेवकांचा आरोप

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - पाणी टंचाई वरून भाजप (BJP) चांगलीच आक्रमण झाली आहे. या पाणी टंचाईचं खापर माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांवर फोडलं आहे. धरणांमध्ये मुबलक पाणी असताना शहरात पाणी टंचाई (Water Scarcity) कशी? असा प्रश्न उपस्थित करत ही पाणी टंचाई कृत्रिम आहे, असा आरोप भाजप नगरसेवकांनी केला आहे.

हे देखील पहा -

नागपूर शहरात 4 मार्चला नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आणि 5 मार्चपासून आयुक्तांकडे प्रशासक म्हणून जबाबदारी आली. मात्र, शहरातील अनेक भागात मुबलक पाणी येत नाही, काही भागात पाणीच येत नाही तर टँकरही मिळत नसल्याची तक्रार भाजप नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली. प्रशासनाच्या नियोजन शुन्य कारभारामुळं शहरात ही परिस्थिती उद्भवली आहे, धरणांमध्ये मुबलक पाणी असताना टंचाई कशी? असे प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारच्या इशाऱ्यावर आयुक्त कारभार करत असल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला आहे.

आयुक्तांनी मात्र हे सर्व आरोप खोडून काढले आहेत. कन्हान परिसरात पंपिंग स्टेशन येथे ट्रिपिंगची समस्या आणि पाणी गळतीमुळे नागपुरात पाणीटंचाई आहे. समस्या सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं मनपा आयुक्तांनी सांगितले आहे.

तांत्रिक कारणामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, यावरून राजकारण पेटलं आहे. भाजपला यावरून मुद्दा मिळाला आहे. त्यामुळंच नगरसेवकांनी राज्य सरकारवर निशाना साधत आगामी महापालिका निवडणुकीचं टायमिंग साधलं आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Flag Boys: तुमच्या बॉयफ्रेंडच्याही अशा सवयी असतील तर वेळीचं व्हा सावध, नाहीतर आयुष्यभर रडालं

Maharashtra Live News Update: रायगडच्या श्रीवर्धनमध्ये पुण्यातील पर्यटकांच्या थार जीपने एकाला चिरडलं

Thursday Horoscope: मनोबल वाढेल, ४ राशींना नोकरीत यश मिळेल, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Bajra Dhapate Recipe : नाश्त्याला काय? फक्त १० मिनिटांत बनवा खमंग - पौष्टिक बाजरीचे धपाटे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; अमृतांजन पुलाच्या खांबाला धडकून ट्रकचा चक्काचूर, केबिनमध्ये अडकला ड्रायव्हरचा मृतदेह

SCROLL FOR NEXT