BJP Adamant On Contesting 32 Lok Sabha Seats, Amit Shah Will Solve The Seat Sharing Rift In Maharashtra Between BJP, NCP And Shiv Sena Saam Tv
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024: भाजपा लोकसभेच्या 32 जागांवर ठाम? शिंदे -पवारांनी केली इतक्या जागेची मागणी; शाह सोडवणार जागावाटपाचा तिढा?

साम टिव्ही ब्युरो

>> सुरज मसुरकर

Lok Sabha Election 2024:

एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र काही जागांवरती शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती मिळत आहे.

शिंदे यांना लोकसभेच्या 22 तर अजित पवार यांना 10 ते 12 जाग्या हव्यात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यातच अमित शाह यांच्यासोबत या दोन्ही नेत्यांची जागावाटपावर चर्चा होऊ शकते, असं बोललं जात आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महायुतीत लोकसभेच्या रत्नागिरि- सिंधुदूर्ग, रायगड , शिरुर , मावळ, नाशिक, रामटेक, पालघर, ठाणे, संभाजीनगर, धाराशिव, परभणी आणि यवतमाळ तिढा निर्माण झाला आहे. हा तिढा अमित शाह हे सोडवतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  (Latest Marathi News)

भाजपा लोकसभेच्या या 32 जागा लढवण्यावर ठाम, यांना मिळू शकते उमेदवारी

1. पुणे : मुरलीधर मोहोळ.

2. धुळे : सुभाष भांबरे यांच्या ऐवजी प्रदिप दिघावरकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता.

3. नांदेड : मिनल खतगावकर

4. जालना : रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता.

5. चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेला पाठवल जाण्याची शक्यता.

6. नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कायम ठेवले जाणार.

7. नंदूरबार : हिना गावित किंवा विजयकुमार गावीत.

8. अकोला : संजय धोत्रे

9. ईशान्य मुंबई : मनोज कोटक

10. सोलापूर : सिद्धेवर महाराज यांच्या ऐवजी अमर साबळे यांना मिळण्याची शक्यता.

11. कोल्हापूर : सध्या ही जागा शिंदे गटाकडे आहे मात्र भाजपा आग्रही आहे.

12. भंडारा-गोंदिया : सुनिल मेंढे

13. बीड : विद्यामन प्रितम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे.

14. माढा - रणजितसिंह निंबाळकर

15. गडचिरोली : अशोक नेते यांच्या ऐवजी राष्ट्रवादी चे मंत्री धर्मराव बाबा अत्राम भाजपा चिन्हावर लढू शकतात.

16. भिवंडी : कपिल पाटील

17. सांगली : संजय काका पाटील यांच्या ऐवजी काँग्रेसचे विशाल पाटील भाजपा पक्ष प्रवेश करून लढू शकतात.

18. सातारा : उदयनराजे भोसले

19. जळगाव : उन्मेष पाटील किंवा ए टे नाना पाटील.

20. दिंडोरी : भारती पवार

21. रावेर : अमोल जावळे

22. उस्मानाबाद : बसवराज पाटील (नुकताच बसवराज पाटील यांनी भाजपा पक्ष प्रवेश केलाय)

23. उत्तर मुंबई : गोपाळ शेट्टी यांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना मिळण्याची शक्यता.

24. संभाजीनगर : विद्यामन मंत्री अतुल सावे किंवा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड.

25: उत्तर मध्य मुंबई : पुनम महाजन यांच्या ऐवजी आशिष शेलार यांना मिळण्याची शक्यता.

26. ठाणे : डॉ.संजीव नाईक यांना मिळण्याची शक्यता. (ही जागा सध्या शिंदे गटाकडे आहे. मात्र भाजपा घेण्यास आग्रही आहे. )

27. रत्नागिरी-सिंधुदुर्ग : नारायण राणे.( रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये अजूनही वाद सुरू आहे. शिंदे गटाकडून किरण सामांत लढण्यास इच्छुक आहेत.)

28. दक्षिण मुंबई : राहूल नार्वेकर ( दक्षिण मध्यदक्षिण मध्य मुंबईचे काँग्रेसचे मिलिंद देवरा यांना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश देऊन राज्यसभा दिली.)

29 . राजेंद्र गावीत : सध्या राजेंद्र गावित शिंदे गटात आहेत. मात्र ते भाजपा पक्षप्रवेश करून भाजपा तिकिटावर लढतील अशी शक्यता आहे.

30. अहमदनगर : सुजय विखे पाटील किंवा राम शिंदे.सध्या नगरमध्ये वाद सुरू आहे.

31. अमरावती : नवनीत राणा यांचा भाजपा पक्ष प्रवेश होईल.मात्र नवनीत राणा यांचा जातीच्या प्रमाणपत्रावरून वाद सुरू आहेत. या जागेवर आनंदराव अडसूळ हे देखील आग्रही आहेत.

32 हिंगोली - हेमंत पाटील यांच्या जागेसाठी भाजप आग्रही असून त्याठिकाणी भाजपा तानाजी मुरकुटे यांना मिळण्याची शक्यता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT