कोळसा घोटाळेबाजांकडून BJP ने देणग्या घेतल्या; संजय राऊतांचा आरोप
कोळसा घोटाळेबाजांकडून BJP ने देणग्या घेतल्या; संजय राऊतांचा आरोप SaamTV
महाराष्ट्र

कोळसा घोटाळेबाजांकडून BJP ने देणग्या घेतल्या; संजय राऊतांचा आरोप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबाद : कोळसा टंचाई (Coal scarcity) निर्माण झाल्याची परिस्थिती देशात असतानाच आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कोळसा घोटाळ्याबाबत एक खळबळजनक विधान केलं आहे. औरंगाबादमध्ये शिवसेनेतर्फे महागाईविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्च्यानंतर संजय राऊत यांनी MGM पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांनी संवाद साधत असताना त्यांनी भाजपवरती निशाना साधला.

हे देखील पहा -

राऊत म्हणाले 'UPA सरकारकारच्या काळात कोळसा घोटाळ्यावर भाजपने संसद बंद पाडली होती. संसदेचं कामकाज करून दिलं नव्हत. मात्र सत्तेत आल्यावर यांनीच कोळसा घोटाळा करणाऱ्याकडून मोठ्या देणग्या घेतल्या, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

तसेच आजच्या आक्रोश मोर्चामध्ये संजय राऊतांनी आपल्या भाषणात भाजपवरती हल्लाबोल केला. संजय राऊत म्हणाले, त्रिपुरात (Tripura) काही झालं आणि दंगे सुरू झाले. महागाईवरुन जनतेने लक्ष हटवण्यासाठी हे सुरू केलं असाही आरोप त्यानी यावेळी केला. देशात महागाईचा प्रश्न निर्माण झाला आहे मात्र यावरती प्रश्न विचारला की, हिंदू-मुसलमान (Hindu-Muslim), पाकिस्तान-भारत-चीन असलेच विषय काढून जनतेची दीशाभूल केली जात असल्याचही ते म्हणाले.

तसेच महाराष्ट्रात आग लावून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे माभ आजचा हा औरंगाबादचा मोर्चा त्यांना इशारा आहे, आम्हाला हात लावला तर हात पेटवल्या शिवाय राहणार नाही. कितीही कारस्थान केली तरी महाराष्ट्रात शिवसेना तुमच्या छताड्यावरती पाय देऊन पुढं जाणारच असं राऊत म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा तिढा सुटला

Exercise Tips: व्यायाम करण्याचा कंटाळा येतोय? या पद्धतीने करा व्यायाम,दिवसभर राहाल फ्रेश

Hemant Dhome News : "साहेब आपली क्षमता आणि चिकाटी आम्हा तरूणांना..."; हेमंत ढोमेची शरद पवारांसाठीची पोस्ट चर्चेत

T20 World Cup 2024 | टी-२० वर्ल्डकप सुरू होण्याआधीच धडकी भरवणारी बातमी! दहशतवादी हल्ल्याची धमकी

Nana Patole On Narendra Modi | अग्निवीर योजनेबद्दल नाना पटोले काय बोलले?

SCROLL FOR NEXT